Homeआरोग्ययुपी; झाशी मेडिकल कॉलेजच्या चाईल्ड वॉर्डला भीषण आग, 10 मुलांचा मृत्यू; सीएम...

युपी; झाशी मेडिकल कॉलेजच्या चाईल्ड वॉर्डला भीषण आग, 10 मुलांचा मृत्यू; सीएम योगींनी घेतली दखल!

झाशीच्या आयुक्तांनी सांगितले की, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली, ज्यामध्ये 10 मुलांचा मृत्यू झाला.

पोलीस वार्ता, लखनऊ: उत्तर प्रदेशातील झाशी मेडिकल कॉलेजमध्ये दि.15 नोव्हेंबर, शुक्रवारी भीषण आग लागली. या अपघातात 10 मुलांचा मृत्यू झाला आहे. मुलांच्या वॉर्डात ही आग लागली. आग लागल्यानंतर रुग्णालयात चेंगराचेंगरी झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आग लागल्यानंतर येथे दाखल असलेल्या रुग्णांना आणि अनेक मुलांना खिडक्यांच्या काचा फोडून बाहेर काढण्यात आले. दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या घटनेची दखल घेतली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.
झाशीच्या आयुक्तांनी सांगितले की, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली, ज्यामध्ये 10 मुलांचा मृत्यू झाला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ते म्हणाले की, गंभीर जखमी मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि आरोग्य विभागाचे प्रधान सचिव घटनास्थळी रवाना झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, झाशी मेडिकल कॉलेजच्या मुलांच्या हॉस्पिटलमध्ये दि.15 नोव्हेंबर, शुक्रवारी रात्री आग लागली. आगीच्या घटनेनंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
आग लागल्यानंतर वॉर्डात उपस्थित डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि परिचरांनी मुलांना वाचवले. आग लागल्यानंतर संपूर्ण वॉर्ड धुराने भरला होता.
  • मुख्यमंत्री योगी यांनी शोक व्यक्त केला..
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली असून, मृत मुलांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे. याशिवाय जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यासोबतच जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
  • 12 तासांत अहवाल सादर करण्याच्या सूचना?
यासोबतच मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक आणि आरोग्य विभागाचे प्रधान सचिव झाशीला रवाना झाले आहेत. याप्रकरणी आयुक्त आणि डीआयजींना अपघाताची चौकशी करून बारा तासांत अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!