Homeक्राईमचोरट्यांचा खेळ खल्लास! घरफोडी करणारे पोलिसांच्या जाळ्यात...

चोरट्यांचा खेळ खल्लास! घरफोडी करणारे पोलिसांच्या जाळ्यात…

पाच आरोपी अटकेत; ६ लाख १६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत..

निंभोरा पोलिसांची कारवाई; मुंबईसह खिर्डी येथून आरोपी ताब्यात…

रावेर/प्रतिनिधी.. दि.23 विनायक जहुरे

रावेर तालुक्यातील खिर्डी येथील घरफोडीच्या घटनांचा तपास करत निंभोरा पोलिसांनी तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती दिली आहे. या कार्यवाहीत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, एकूण ६ लाख १६ हजार ८१० रुपये किमतीचा सोन्या-चांदीचा ऐवज व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

पोलिसांच्या कार्यवाहीमुळे खिर्डी परिसरातील घरफोडीच्या घटनांचा तपास पुढे आला आहे.
घर बंद असल्याची संधी साधून चोरी , पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खिर्डी जुना वाघाडी रोड येथील रहिवासी शेहनाज शेख अख्तर या कुटुंबासह बाहेरगावी गेल्या असताना, १३ ते १४ सप्टेंबर २०२६ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६ लाख ३२ हजार ८१० रुपयांचा ऐवज चोरीला होता.

याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ), ३३१ (३) आणि ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुंबईसह खिर्डीतून आरोपी ताब्यात

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला.तपासादरम्यान एका आरोपीला मुंबई येथून, तर इतर आरोपींना खिर्डी गावातून ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेतील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

१) नवाज शेख शरीफ (वय २३) रा.खिर्डी बु.
२) अशपाक ऊर्फ अट्ट्या शेख रमजान (वय ३२) खिर्डी बु
३) शहादत बेग रफिक बेग (वय २२) खिर्डी खुर्द
४) चेतन लिलाधर जाधव (वय २९) खिर्डी बु
५) शाकीब बेग साबीर बेग (वय ३२) सर्व रा.खिर्डी खुर्द, ता. रावेर येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत,
पोलिसांच्या माहितीनुसार, तपासादरम्यान आरोपींकडून पहिल्या घरफोडीतील चोरीच्या मुद्देमालापैकी ५ लाख ७९ हजार ३१० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.

यामध्ये सोन्याची पोत, कानातील झुमके, अंगठ्या, चांदीचे फुलतोडे, गुजऱ्या, बांगड्या आणि हातातील कड्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.

आणखी दोन घरफोडींचा तपासात उलगडाअटकेतील आरोपींकडून करण्यात आलेल्या चौकशीत खिर्डी गावातील आणखी दोन घरफोडींच्या घटनांची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. या तपासातून चेतन जाधव याचे नाव निष्पन्न झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

या दोन्ही गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेल्या १ लाख ७७ हजार ४०० रुपयांच्या मुद्देमालापैकी ३७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.

चांदीच्या लक्ष्मी, शारदा, बालगोपाळ व गणेशाच्या मूर्ती तसेच सोन्याच्या बाळ्यांचा जप्त मुद्देमालात समावेश असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

सदर कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

निंभोरा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सपोनी. मीरा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तपास अधिकारी पोउनी.ए. एम. ढाकणे, ममता आर. तडवी तसेच पोलीस अंमलदार रिजवान पिंजारी, अविनाश पाटील, सुभाष शिंदे, परेश सोनवणे, किरण जाधव, सर्फराज तडवी आणि इतर कर्मचाऱ्यांनी तपासात सहभाग घेतला.

अटकेतील आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास निंभोरा पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये दिवसा घरफोडी; २४ तासांत दोन आरोपी जेरबंद

0
सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कारवाई; ५० हजार रोकड व तीन तोळे सोन्याचे दागिने जप्त रावेर : ( विनायक जहुरे ) शहरातील जुनी नगरपालिका रोड...

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीसह नणंदेला जन्मठेप

0
दोघांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड; दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद भुसावळ : चारित्र्याच्या संशयातून विवाहित महिलेची लाकडी ओंडक्याने मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी पतीसह...

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

error: Content is protected !!