Homeक्राईमजामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात

जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी व्यक्तीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी (ता. २१) जामनेर तहसील कार्यालयात करण्यात आली. या प्रकरणात महसूल सहायकासह दोन जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, तक्रारदार हे ३२ वर्षीय असून त्यांचा व्यवसाय नोकरी आहे. जामनेर येथील त्यांच्या शेतातील गट क्रमांक ४०७ मधून जाणाऱ्या रस्त्याच्या संदर्भात तहसील कार्यालयात सन २०२२ मध्ये दावा दाखल करण्यात आला होता. या दाव्याची सुनावणी होऊन अंतिम निकाल प्रलंबित आहे.

या प्रकरणातील आरोपी महसूल सहायक प्रविण सुभाष गांगुर्डे (वय ४२), रा. अयोध्या नगर, जामनेर, हे तहसील कार्यालय, जामनेर येथे कार्यरत आहेत. तर दुसरा आरोपी योगेश रामलाल वखरे (वय ४२) हा खासगी व्यक्ती असून तो जामनेर येथील रहिवासी आहे.

तक्रारदार तहसील कार्यालयात गेले असता आरोपींनी शेतातील नवीन रस्त्याबाबतचा निकाल त्यांच्या बाजूने लावून देण्यासाठी सुरुवातीला ३० हजार रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर तडजोडीअंती २५ हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली. याबाबत तक्रारदाराने २१ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दिली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सोमवारी जामनेर तहसील कार्यालयात पंचांच्या उपस्थितीत सापळा रचण्यात आला. यावेळी खासगी व्यक्ती योगेश वखरे याने महसूल सहायक प्रविण गांगुर्डे यांच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला पकडले. त्याच्याकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातील कलम ७, ७ अ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोन्ही आरोपी एसीबीच्या ताब्यात असून पुढील कारवाई सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा पथकात पोलीस कर्मचारी तसेच पंचांचा सहभाग होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना लाचेची मागणी झाल्यास तत्काळ विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीसह नणंदेला जन्मठेप

0
दोघांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड; दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद भुसावळ : चारित्र्याच्या संशयातून विवाहित महिलेची लाकडी ओंडक्याने मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी पतीसह...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

0
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...

error: Content is protected !!