Homeक्राईमभुसावळात १६ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

भुसावळात १६ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

वडिलांनी केली उपचार पद्धतीच्या चौकशीची कारवाईची मागणी

भुसावळ, दि. ३० ऑगस्ट २०२६ : भुसावळ शहरातील १६ वर्षीय मुलीला पोटात अचानक तीव्र दुखू लागल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुलीचे वडील संतोष सोनवणे यांनी केली आहे.

याबाबत संतोष सोनवणे (वय ४१, रा. रूपवते हाउसिंग सोसायटी, भुसावळ, ) यांनी दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांची मुलगी नेहा संतोष सोनवणे (वय १६ वर्षे) ही आपल्या कुटुंबासोबत राहत होती. दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजता नेहाने पोट दुखत असल्याचे वडिलांना सांगितले. त्यानंतर ते कामावर जाण्यासाठी निघाले.

दरम्यान, ते कामावर असताना पत्नीचा फोन आला. नेहाचे पोट खूप दुखत असल्याचे पत्नीने सांगितले. त्यामुळे संतोष सोनवणे हे घरी आले. सुमारे १०.३० वाजता त्यांनी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात नेले. संबंधित ठिकाणी रुग्णालय बंद असल्याने पुढे तिला भुसावळ तहसीलदार कार्यालयासमोरील श्री. हरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भुसावळ येथे दुपारी सुमारे १ वाजता उपचारासाठी दाखल करण्यात आले.
रुग्णालयात डॉ. गायत्री विनोद चौधरी यांनी मुलीवर उपचार सुरू केले. उपचारादरम्यान मुलीची सोनोग्राफी करण्यात आली. सोनोग्राफीच्या अहवालानुसार तिच्या पोटात गाठ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही गाठ दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करून काढता येईल आणि त्याबाबत फारशी चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे.
मात्र उपचार सुरू असतानाच परिस्थिती गंभीर बनली. निवेदनानुसार, दुपारी सुमारे ३.१५ वाजता नेहाचा मृत्यू झाला. अचानक झालेल्या या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

संतोष सोनवणे यांनी आपल्या निवेदनात मुलीच्या मृत्यूबाबत संबंधित रूग्णालयातील उपचार पद्धतीची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कार्यवाही करून वस्तुस्थिती समोर आणावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान, १६ वर्षीय मुलीला सकाळी पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर काही तासांतच तिचा मृत्यू झाल्याने या घटनेबाबत विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. नेमका मृत्यू कशामुळे झाला, उपचारादरम्यान कोणती वैद्यकीय परिस्थिती निर्माण झाली आणि उपचाराची प्रक्रिया योग्य पद्धतीने झाली का, याबाबत चौकशीनंतरच स्पष्टता होणार आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेकडून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

0
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...

error: Content is protected !!