Homeक्राईमभुसावळ : सार्वजनिक ठिकाणी शस्त्रसाठा लपविल्याचा कट उधळला ; एक अटकेत,एक फरार

भुसावळ : सार्वजनिक ठिकाणी शस्त्रसाठा लपविल्याचा कट उधळला ; एक अटकेत,एक फरार

भुसावळ, ता.१ : (निलेश.के.फिरके) शहरातील वरणगाव रोड परिसरात गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने दोन तरुणांनी सार्वजनिक ठिकाणी गावठी शस्त्रे लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी तत्पर कारवाई करत एकास अटक केली असून दुसरा आरोपी फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव रोडवरील आलीशान वॉटर पार्कच्या मागील भागात झाडाझुडपांमध्ये दोन गावठी पिस्टल व एक गुप्ती लपवून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांना मिळाली होती. माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले.

पथकातील विजय नेरकर,कांतीलाल केदारे,चंद्रकांत रायपूरकर, योगेश माळी,सचिन चौधरी,अक्षय कोतकर,भूषण चौधरी,महेंद्र पाटील, जावेद शहा व जीवन कापडे यांनी संशयितांना ताब्यात घेत घटनास्थळी धाव घेतली.यावेळी संशयिताने पोलिसांना लिंबाच्या झाडाजवळ नेऊन झाडाच्या बुंध्याशी पाळापाचोळ्यात लपवून ठेवलेली दोन गावठी पिस्टल व एक गुप्ती दाखवून दिली.

या कारवाईत पोलिसांनी सुमारे ७१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी भूषण शांताराम कोळी (वय १९, रा. पाडळसा, ता. यावल) यास अटक करण्यात आली असून त्याचा साथीदार गोलू जैन (रा. साकेगाव) हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

भूषण चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी कांतीलाल केदारे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चिमुकली वर अत्याचार करित केली हत्या

0
भोर (राम पाचकाळे) तालुक्यातील नसरापुर येथे ६५ वर्षीय नराधमाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या : नसरापूर येथील घटना. नसरापूर ता भोर येथे एका...

काझी प्लॉटमध्ये भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे लाखोंचे नुकसान

0
भुसावळ : शहरातील काझी प्लॉट परिसरात  एका राहत्या घराला अचानक रात्री दहा वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना ता.१ रोजी घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे...

जबलपुर में मां की ममता ने आखिरी सांस तक बेटे को थामे रखा था...

0
जबलपुर ( रमाकांत मोरे ) में हुए दर्दनाक क्रूज़ हादसे की यह तस्वीर हर किसी की आंखें नम कर रही है। पानी में तैरती...

भुसावळ : जनगणना 2027 साठी स्व-गणना प्रक्रियेची माहिती जाहीर

0
भुसावळ : आगामी जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी स्व-गणना (Self Enumeration) प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून त्याबाबत प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत....

लापरवाही से वाहन चलाने पर एक वर्ष की सजा, आरोपी दोषी करार

0
बुरहानपुर (म.प्र.), 30 अप्रैल 2026 — जिला लोक अभियोजन अधिकारी कार्यालय द्वारा जारी प्रेस विज्ञप्ति के अनुसार, सड़क दुर्घटना के एक मामले में न्यायालय...

error: Content is protected !!