वर्षा अखेरचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने दि. 26, 28, 29 व 31 मार्च 2026 या चार सुटीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये सुरु..

पोलीस वार्ता, नाशिक : 2025 आर्थिक वर्ष समाप्ती तसेच नूतन वर्षानिमित्त नागरिकांचा मालमत्ता खरेदी करण्याकडे जास्त कल असल्यामुळे दस्त नोंदणीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय वर्षा अखेरचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने दि. 26, 28, 29 व 31 मार्च 2026 या चार सार्वजनिक सुटीच्या दिवशी नाशिक शहरातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सुरु राहणार आहेत, असे नाशिकचे सह. जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संदीप आहेर यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे जाहीर केले आहे.





































