Homeताज्या बातम्याकृष्णा नदीत अज्ञात चिमुकल्याचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे आवाहन

कृष्णा नदीत अज्ञात चिमुकल्याचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे आवाहन

उंब्रज | प्रतिनिधी । कराड तालुक्यातील वडोली भिकेश्वर गावाच्या हद्दीत कृष्णा नदीच्या पात्रात सुमारे ८ ते ९ वर्षांच्या अज्ञात मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

स्थानिक नागरिकांना नदीवरील पुलाजवळ पाण्यावर मृतदेह तरंगताना दिसताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.यानंतर उंब्रज व मसूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बोटीच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला.

मात्र, मृत मुलाची ओळख अद्याप पटलेली नसल्याने घटनेभोवती गूढ निर्माण झाले आहे. मुलाचा मृत्यू पाण्यात बुडून झाला की त्यामागे घातपात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी सांगितले की, मुलाची ओळख पटल्यावरच या प्रकरणाचा नेमका उलगडा होऊ शकतो.

या घटनेची नोंद मसूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सर्व पातळीवर तपास सुरू आहे. मृत मुलाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून सोशल मीडियाचा देखील वापर केला जात आहे.दरम्यान, या मुलाबाबत कोणाला काही माहिती असल्यास तात्काळ मसूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी तपास वेगात; आरोपींकडून घटनास्थळी पुनर्रचना, उर्वरित तिघांचा शोध सुरू

0
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...

बोरखेडा हत्याकांडातील आरोपीला दुहेरी फाशी

0
१०४ पानी निकालात आरोपीच्या क्रौर्यावर न्यायालयाचे ताशेरे; भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा भुसावळ : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बोरखेडा येथील चार निष्पाप भावंडांच्या...

error: Content is protected !!