(उपविभागीय अभियंता सा.बां विभाग व मक्तेदारांचे संगनमत)
भुसावळ – तालुक्यातील कंडारी गावात उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग व मक्तेदार यांच्या संगनमताने महिलांचे सार्वजनिक शौचालय जे.सी.बी.मशिनव्दारे तोडल्याने महिलांचे हाल होत आहे.
सरपंच ग्रामपंचायत कमिटी कंडारी यांनी ता.३ जून २०२५ रोजी दिलीप सीताराम मोरे वैगरे ४३ नागरिकांच्या मागणीनुसार (प्रेसिडिंग बुक ता.२७/६/२०२५) चा ठराव नं.४) वार्ड क्रमांक २ मध्ये सामाजिक सभागृह,अंगणवाडी,शिवगुफा येथे संरक्षण भिंतीचे काम करणे बाबतची मागणी केली होती. उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांनी महिलांचे सार्वजनिक शौचालयाचे कुठलेही ऑडिट किंवा जीर्ण झाल्याचा दाखला ग्रामपंचायतीला दिलेला नाही तसेच ग्रामपंचायतीशी कुठला ही पत्रव्यवहार केलेला नाही.उपविभागीय अभियंता व मक्तेदार यांनी संगनमत करीत महिलांचे सार्वजनिक शौचालय जे.सी.बी.मशिनव्दारे तोडले.या प्रकारामुळे महिलांना आजरोजी उघड्यावर बसण्याची वेळ सार्वजनिक बांधकाम उपविभाग व मक्तेदारामुळे आल्याने महिलांचे हाल होत आहे.

यासंदर्भात उपविभागीय अभियंता चंद्रशेखर तायडे यांना विचारणा केली असता सदरील प्रकरण हे अंगलट येणार असल्याने आम्ही मक्तेदारास महिलांचे सार्वजनिक शौचालय तोडण्यास कुठलीही परवानगी दिलेली नाही. त्या प्रकरणाचा कार्यालयाशी कुठलाही सबंध नाही असे सांगून एकप्रकारे उपविभाग अभियंता यांनी अंग झटकले आहे.

























