Homeक्राईम26 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी श्रीमती पुष्पलता...

26 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी श्रीमती पुष्पलता दिघे यांची उल्लेखनीय कारकीर्द..

उपअधीक्षक पुष्पलता दिघे यांचे पोलीस विभागातून, कुटुंब आणि जवळच्या सहकार्यांकडून कौतुक व अभिनंदन होत आहे..

पोलीस वार्ता, मुंबई : रायगड-रत्नागिरी विभाग महामार्ग वाहतूक सुरक्षा पोलीस विभागातील उपअधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या श्रीमती पुष्पलता राजाराम दिघे यांना उत्कृष्ट सेवेबद्दल 26 जानेवारी 2026 रोजी भारत सरकारचे मानाचे राष्ट्रपती पोलीस पदक 2026 जाहीर झाले आहे. उपअधीक्षक दिघे या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील तळेगाव, दिघे येथील रहिवाशी आहेत.
महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपअधीक्षक पुष्पलता दिघे यांनी ‘शून्य अपघात’ ही मोहीम यशस्वीपणे राबवली आहे. राज्य गुप्तवार्ता विभागात कार्यरत असताना दहशतवाद आणि नक्षलवाद विरोधी मोहिमेत माहिती संकलनाचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी पार पाडले आहे. तसेच गुन्हे शाखेमध्ये असताना अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांचा मोठा सहभाग राहिला असून विशेषतः गुन्हे शाखेत कार्यरत असताना ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत पीडित महिला व मुलींची सुटका करणे, तसेच ‘ऑपरेशन स्माईल’ च्या माध्यमातून अपहरण झालेल्या बालकांना शोधून त्यांना पुन्हा कुटुंबापर्यंत पोहोचवण्याच्या कामात त्यांनी विशेष योगदान दिले आहे. अनैतिक मानवी तस्करी आणि बालकामगार विरोधी मोहिमांमधील त्यांच्या कामगिरीची दखल देशपातळीवर घेतली गेली व त्यांच्या या कर्तबगारीबद्दल त्यांना यापूर्वी पोलीस महासंचालक आणि गृह विभागातर्फे राज्यस्तरीय पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक(सी.आय.डी) यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला आहे.

श्रीमती पुष्पलता दिघे या 1996 च्या PSI बॅचमधील पहिल्या महिला परेड कमांडर आहेत. त्यांच्या बॅचदरम्यान उत्कृष्ट कायदेशीर ज्ञान, कौशल्य आणि समर्पित सेवेसाठी त्यांना 6 प्रतिष्ठित कायदा पुरस्कार हे मिळाले आहेत. त्यांच्या यशात त्याचे पती डॉ.राजाराम दिघे यांचा देखील मोठा वाटा आहे. ते महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाआंतर्गत संचालक, ग्रामीण गृहनिर्माण विभागात मुंबईत वरीष्ठ अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे अतिरिक्त व्हिलेज सोसियल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन, मुंबई येथील मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा देखील कार्यभार आहेत.

राष्ट्रपती पदक श्रीमती पुष्पलता दिघे यांना जाहीर होताच त्यांच्या पोलीस विभागातून, कुटुंब आणि जवळच्या सहकार्यांकडून कौतुक व अभिनंदन होत आहे. त्यांनी समाजात केलेल्या चांगल्या कामाची त्यांना पावती मिळाली आहे. त्यांनी गावाचे संगमनेर तालुक्याचे नाव उंचावले आहे. गावातील शहरात शिक्षण घेणाऱ्या भावी तरुण व तरुणींना एक आदर्श निर्माण केला आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

0
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...

गणपती मिरवणुकीत अल्पवयीन मुलीला मारहाण; न्हावीत काही काळ तणाव

0
न्हावी, ता. यावल : गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी महादेववाडा परिसरात उभ्या असलेल्या १६ वर्षीय मुलीला युवकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडल्याची माहिती...

सोमेश्वर महाराजांच्या आगमनाने रामायण नगरात भक्तिमय वातावरण

0
हॉटेल राधाकृष्णपासून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक; ‘महाकाल’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला भुसावळ : उज्जैन येथील सोमेश्वर महाराजांचे भुसावळ शहरातील रामायण नगर परिसरात आगमन झाले. महाराजांच्या आगमनानिमित्त...

गीता गुप्ता को श्री खाटू श्याम सेना ट्रस्ट जयपुर की राष्ट्रीय प्रचार मंत्री नियुक्त...

0
(रमाकांत मोरे) श्री खाटू श्याम सेना ट्रस्ट के राष्ट्रीय अध्यक्ष विकास चंद्र जी अग्रवाल ने राष्ट्रीय स्तरीय महिला मोर्चा का विस्तार करते हुए श्री...

error: Content is protected !!