णमोकार तीर्थ महोत्सवाची प्रस्तावित कामांना गती देवून 30 जानेवारीपर्यंत सर्व कामे पूर्ण करावेत जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या सूचना..
पोलीस वार्ता, नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आढावा बैठक आज 22 जानेवारी 2026 रोजी पार पडली. यावेळी चांदवड तालुक्यातील मालसाने येथे 6 ते 25 फेब्रुवारीपर्यत सुरू होणाऱ्या णमोकार तीर्थ महोत्सवाची प्रस्तावित कामांना गती देवून 30 जानेवारीपर्यंत सर्व कामे पूर्ण करावेत यासंबंधी नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
महोत्सवासाठी महत्वाच्या पाहुण्यांसह पर्यटक भेट देणार आहेत. यादृष्टने सर्व विभागांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडावी. पाणीपुरवठा विभागाने महोत्सव काळात पाण्याचे योग्य नियोजन करावे. पार्किंग व्यव्यस्था, अंतर्गत रस्ते याबाबतची कामांना गती द्यावी. महोत्सवाच्या ठिकाणी नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी यांना 24 जानेवारीपर्यंत कार्यालयीन आदेश निर्गमित करावेत. प्रस्तावित कामांसाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्यास त्याबाबतचे प्रस्ताव 24 जानेवारीपर्यंत तातडीने सादर करावेत असे देखील जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी बैठकीस सहा. जिल्हाधिकारी कश्मिरा संखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर, महावितरणचे कार्यकारी अभियंता बिऱ्हाडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, निवासी वैद्यकीय अधिकारी बाळू पाटील, चांदवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, पाणीपुरवठा विभागाच्या श्रीमती वाडिले, सुमेर काला व ट्रस्टचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या या बंगल्याला राज्य शासनाने जतन व संवर्धन करावे..
पोलीस वार्ता, नाशिक | महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर सन 11 ऑक्टोबर 1935...
‘सोन्या’ला पहाटे ताब्यात घेत दिवसभर कसून चौकशी
भुसावळ : खडका रोडवरील मोहम्मद अली रोड परिसरातून एजाज आयुब खान ऊर्फ ‘सोन्या’ यास ठाणे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या...
सीसीटीव्हीने शोध घेऊन आरोपींना अटक करून चोरीचे 50 हजार रोकड व तीन तोळे सोन्याचे दागिने जप्त..
पोलीस वार्ता, रावेर | शहरातील जुनी नगरपालिका रोड परिसरातील एका...
पाच आरोपी अटकेत; ६ लाख १६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत..
निंभोरा पोलिसांची कारवाई; मुंबईसह खिर्डी येथून आरोपी ताब्यात...
रावेर/प्रतिनिधी.. दि.23 विनायक जहुरे
रावेर तालुक्यातील खिर्डी येथील...
दोघांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड; दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद
भुसावळ : चारित्र्याच्या संशयातून विवाहित महिलेची लाकडी ओंडक्याने मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी पतीसह...