विविध कार्यक्रमांसह आदिवासी निवासी योगा कार्यक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांसोबत नास्ता व संवाद साधून, वेणूबाई देवराज या महिला शेतकरी यांच्या शेती कामात सहभागी होणार..
पोलीस वार्ता, नाशिक : राज्याचे राज्यपाल महोदय आचार्य देवव्रत हे गुरूवार 1 जानेवारी 2026 रोजी नाशिक दौऱ्यावर येणार आहे दुपारी 2 वाजता ओझर विमानतळ येथे त्यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर ते तिथून पुढील नियोजित विविध कार्यक्रमास दुपारी 2.30 ते 4.30 वाजेपर्यंत सह्याद्री फार्म, मोहाडी, दिंडोरी येथे उपस्थित राहणार आहे.
राज्यपाल महोदय दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड येथील ‘प्रशासन गांव की और’, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आरोग्य शिबिर कार्यक्रम, ‘एक पेड माँ के नाम’ कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमास दुपारी 4.30 ते 8.30 वाजेदरम्याने उपस्थिती राहणार आहे. त्याच वेळी शासकीय आदिवासी आश्रमशाळा येथे आदिवासी मंत्री, सचिव (आदिवासी) व वनवासी कल्याण आश्रम समिती सदस्यांसोबत राखीव तसेच आदिवासी संस्कृती परिचय घेत स्थानिक नागरिकांसोबत चावडी संवाद देखील साधणार आहेत.
दुसऱ्या दिवशी दि.2 जानेवारी 2026 शुक्रवार रोजी मा. राज्यपाल आचार्य देवव्रत पिंपरखेड येथील आदिवासी निवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसोबत सकाळी 7 ते 8.40 वाजे दरम्यान आदिवासी निवासी योगा कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांसोबत नास्ता व संवाद साधून पुढे वेणूबाई देवराज या महिला शेतकरी यांच्या शेती कामात सहभागी होणार आहेत. तसेच सकाळी 9 ते 9.30 वाजता दिंडोरी तालुक्यातील खोरीपाडा येथे शेतकरी संपत राऊत यांची नैसर्गिक शेती व जनवारांचे गोठे यांची पाहणी करत स्थानिक शेतकरी नागरिकांची संवाद साधणार आहे. पुढे सकाळी 11.10 ते 12.10 वाजेला ओझर येथील विमान कारखान्यास भेट देऊन तेथील कामगार वर्गाशी संवाद साधणार आहे.
सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत..
पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी नाशिक...
सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत..
पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी नाशिक...