Homeआरोग्यतपोवनातील 10 वर्षांच्या आतील 1 हजार 700 वृक्षांचे पुन:रोपण सिडकोतील पेलिकन पार्क...

तपोवनातील 10 वर्षांच्या आतील 1 हजार 700 वृक्षांचे पुन:रोपण सिडकोतील पेलिकन पार्क येथे करणार

पर्यावरण संवर्धनासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. शहरातील तपोवन परिसरातील दहा वर्षांच्या आतील वृक्षांची तोड न करता त्यांचे पुनर्रोपण..

पोलीस वार्ता, नाशिक : शहरातील पेलिकन पार्क येथे दि.5 डिसेंबर 2025 रोजी दुपारी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी नियोजित जागेची पाहणी राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात नवीन 15 हजार वृक्षांची लोकसहभागातून लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे.
मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितले की, राज्य शासन पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आहे. यास नाशिक शहराचा अपवाद नाही. पर्यावरण संवर्धनासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यामुळेच शहरातील तपोवन परिसरातील दहा वर्षांच्या आतील वृक्षांची तोड न करता त्यांचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबरोबरच नाशिक शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात येईल. ज्यामुळे पर्यावरण संवर्धनास मदत होईल.
आगामी कुंभमेळा हरित आणि डिजिटल करण्याचे नियोजन आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील तपोवन परिसरात विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. यासाठी केवळ 10 वर्षांच्या आतील 1 हजार 700 वृक्षांचे पुन:रोपण शहरातील सिडको येथील पेलिकन पार्क, गंगापूर गाव येथील कानेटकर उद्यानासह उपलब्ध जागांच्या ठिकाणी केले जाणार आहे. यासह शहरात नवीन 15 हजार वृक्षांची लागवड शासन व लोकसहभागातून केली जाणार आहे.
यात वड, पिंपळ, जांभूळ अशा अनेक देशी प्रजातीच्या वृक्षांचा समावेश असून 15 फूट वाढ झालेले हे वृक्ष हैदराबाद येथून मागविण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक निधी सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) खर्च करण्यात येणार आहे. तपोवनातील वृक्षांच्या पुन:रोपणासह नवीन लावण्यात येणाऱ्या वृक्षांची योग्य देखाभाल व निगा राखण्यात येईल. या वृक्षांमुळे हरित नाशिक- हरित कुंभमेळा संकल्पना साकार होवून आगामी काळात पर्यटनाच्या दृष्टीने नाशिकची वेगळी ओळख निर्माण होईल, असा विश्वास मंत्री महाजन यांनी व्यक्त केला.
 यावेळी आमदार सीमा हिरे, माजी आमदार अपूर्व हिरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, उप अभियंता हेमंत नांदुर्डीकर, उद्यान अधीक्षक विवेक भदाणे, उद्यान निरीक्षक प्रशांत परब यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद

0
व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्Paragraphया हल्ल्यानंतर तरुणाचा...

दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर तरुणाचा मृत्यू झाल्याच्या खळबळजनक प्रकरणात भुसावळ पोलिसांनी...

बोरखेडा हत्याकांड : ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ ठरवत फाशीची मागणी; शिक्षेचा निकाल आज

0
उज्वल निकम यांचा ४५ मिनिटांचा जोरदार युक्तिवाद; आरोपीकडून किमान शिक्षेची विनंती भुसावळ - रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे १५ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या चार निष्पाप भावंडांच्या...

error: Content is protected !!