Homeराजकीयमेहतर-वाल्मिकी समाजाची एकजूट ! ममता अजय डागोर यांना पूर्ण ताकदीने जाहीर पाठिंबा

मेहतर-वाल्मिकी समाजाची एकजूट ! ममता अजय डागोर यांना पूर्ण ताकदीने जाहीर पाठिंबा

विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास

भुसावळ, दि. २९ नोव्हेंबर २०२५ (निलेश फिरके) भुसावळ नगरपालिकेच्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार ममता अजय डागोर यांना प्रभाग क्रमांक ९ ‘ब’ या प्रभागातील मेहतर-वाल्मिकी समाजाने एकदिलाने व एकजूट होऊन जाहीर पाठिंबा दिला असल्याचे ममता अजय डागोर यांनी सांगितले आहे. समाजाच्या या मोठ्या पाठबळामुळे ममता डागोर यांच्या प्रचाराला कमालीची ताकद मिळाली असून, त्यांनी आपला विजय आता शंभर टक्के निश्चित असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

“मी सर्वांगीण विकासाचे स्पष्ट व्हिजन घेऊन उतरले आहे. प्रचारादरम्यान घरोघरी मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि प्रेम पाहता विजय आमचाच आहे,” असे ममता अजय डागोर यांनी सांगितले आहे. दरम्यान, प्रभागात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले समाजसेवक अजय कुमार डागोर व आकाश डागोर यांच्या जनहिताच्या सातत्यपूर्ण कामामुळे मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसत आहे. मेहतर-वाल्मिकी समाजाच्या या पाठिंब्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार ममता अजय डागोर यांच्या प्रचाराला आणखी भक्कम बळ मिळालेले आहे.

या पाठिंबा जाहीर करण्याच्या कार्यक्रमात मेहतर-वाल्मिकी समाजाचे प्रमुख नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात कैलास मट्टू, नितीन करोसिया, दिनेशभैय्या खरारे, गोपाळ तांबोळी, श्याम तांबोळी, रंजीत मट्टू, सुरज मट्टू, लखमीचंद्र चावरे, अशोक लखन, बबलू कचवे, रंजीत महाराज कचवे, संजू मट्ट, दीपक कचवे, सौरभ तांबोळी, आदित्य खोकरे, ओम मोहित, विजय नरवाडे, करण सरपदे, संतोष बोयत तसेच रेखाबाई करोसिया, रोहिणीबाई खरारे, विद्या मट्ट, कलाबाई खरारे, राधाबाई पवार, मीराबाई नरवाडे, छायाबाई खरारे आदींसह समाजातील सुजाण नागरिक आणि प्रतिष्ठित मतदार महिला-पुरुष व कार्यकर्ते उपस्थित होते. मेहतर-वाल्मिकी समाजाच्या या एकदिल पाठिंब्याने प्रभाग क्र. ९ ‘ब’ मधील निवडणूक आता एकतर्फी होण्याचे चिन्ह दिसत आहे. ममता अजय डागोर यांचा विजय आता केवळ औपचारिकता राहिल्याची चर्चा रंगली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

0
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी तपास वेगात; आरोपींकडून घटनास्थळी पुनर्रचना, उर्वरित तिघांचा शोध सुरू

0
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...

error: Content is protected !!