नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. रस्ता रुंदीकरण करताना नागरिकांच्या मागण्या विचारात घेऊन मार्ग काढण्यात येईल..

पोलीस वार्ता, नाशिक : नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने होणाऱ्या विकास कामांमध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यांची कामे महत्त्वाची असून राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दि. रोजी या रस्त्याची पाहणी केली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधला, त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. रस्ता रुंदीकरण करताना नागरिकांच्या मागण्या विचारात घेऊन मार्ग काढण्यात येईल. असे त्यांनी स्थानिक नागरिकांना सांगितले.

तसेच नागरिकांचे व शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही अशीच भूमिका सरकारची राहील आणि रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत सर्वानुमते सहमतीने निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी रस्त्याच्या रुंदीकरणाशी मोजणी व बाधित होणाऱ्या क्षेत्र याबाबत मंत्री महाजन यांच्या उपस्थितीत मोजणी करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील नागरिकांचा संवाद मंत्री महाजन यांनी साधून दिला.





































