भुसावळ – शहरातील पंधरा वर्ष ११ महिने वयोगटांची अल्पवयीन मुलगी ही घरात एकटी झोपलेली असल्याचा त्रेचाळीस वर्षीय नराधमाने फायदा घेत तिच्या सोबत जोर – जबरदस्तीने शारिरीक सबंध प्रस्तापित केल्याची घटना मंगळवार (१६) रोजी घडली.याप्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.पोलिसांनी पोस्को गुन्ह्यातील संशयिताला अटक करून न्यायालयात हजर केले असता सब जेल रवानगी करण्यात आलेली आहे.अकिल अब्दुल अजीज शेख असे संशयितांचे नाव आहे.
याबाबत अल्पवयीन पीडित मुलीने दिलेल्या माहिती नुसार संशयित आरोपी यांची पत्नी पाच दिवसासाठी कामा निमित्त बाहेर गावी गेलेली होती.अल्पवयीन मुलगी घरामध्ये झोपलेली असतांना यांचा फायदा घेत जोर – जबरदस्तीने ता.१६ रोजी शारिरीक सबंध प्रस्तापित केले.याबाबत पीडित मुलीने आई व मावशीला सांगितले असता ता.२० रोजी पोलीस स्टेशनला पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.पोलिसांनी संशयित आरोपीला रेणुका नगर भागातून ता.२० रोजी अटक केली. संशयितास न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलिसांनी संशयित आरोपीला ता.२२ रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सूनावल्याने संशयितांची सब जेल जळगांव रवानगी करण्यात आलेली आहे.


























