गंभीर जखमी असल्यामुळे देठे यांना पुढील उपचारासाठी वणीतून नागपूर येथे हलवण्यात आले परंतु रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला..

पोलीस वार्ता, (यवतमाळ) वणी : शहरातील गणेशपुर येथील वणी-मुकुटबन मार्गावर सोमवारी दि.25 ऑगस्ट 2025 रोजी, सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास एका कामगाराचा सायकल वरून जात असताना ट्रकने दिलेल्या धडकेत अपघात झाला होता. आता उपचारा दरम्यान सायकल स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.





































