छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आदिवासी बांधवांनी रॅलीला सुरुवात केली..
पोलीस वार्ता, वणी : यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात 9_ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील आदिवासी बांधवांनी एकत्र येत भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते.
वणीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आदिवासी बांधवांनी रॅलीला सुरुवात केली पुढे रॅली मार्गस्थ होत, साई मंदिर चौक, टिळक चौक, गांधी चौक, भगत सिंग चौक नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहचल्यावर त्यांना अभिवादन करुन घोषणा देत पुढे रॅली आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेले वणीतील भीमालपेन देवस्थान येथे पोहचली त्यानंतर दर्शन घेऊन रॅली थांबली.
रॅलीत सहभागी होण्यासाठी आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कार्यकर्त्या पुष्पाताई आत्राम, सामाजिक कार्यकर्ते सुभाष आडे, सौ.माया ताई मरस्कोल्हे, संतोष चांदेकर यांनी रॅलीत मार्गदर्शन केले. या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन ॲड.अरविंद सिडाम यांनी केले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त निघालेल्या या रॅलीची सांगता शेवटी आदिवासी संस्कृतीच्या सामूहिक नृत्य परंपरेने झाली.
१०४ पानी निकालात आरोपीच्या क्रौर्यावर न्यायालयाचे ताशेरे; भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा
भुसावळ : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बोरखेडा येथील चार निष्पाप भावंडांच्या...
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...