Homeआरोग्यअंबड हद्दीतील खुनाच्या प्रयत्नातील चार फरार रेकॉर्डवरील आरोपी अखेर गुन्हेशाखा युनिट-2 च्या...

अंबड हद्दीतील खुनाच्या प्रयत्नातील चार फरार रेकॉर्डवरील आरोपी अखेर गुन्हेशाखा युनिट-2 च्या ताब्यात!

अज्ञातांनी बिल्डींगच्या कम्पाऊंडमध्ये प्रवेश करून दरवाजावर जोरजोरात लाथा मारून खिडकीच्या काचा व जाळी तोडुन घरासमोरील कुंडी तसेच मोठी फरशी स्टाईल दरवाजावर मारून दहशत केली..

पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरातील चोरी, घरफोड्या तसेच गुन्ह्यातील फरार सराईत गुन्हेगारांचा तपास करून कारवाई करण्याचे आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक साहेब यांनी शहर पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
त्यानुसार अंबड पोलीस ठाणे येथे दि.28 मार्च 2025 रोजी दाखल झालेल्या गुरनं- 309/2025 या गुन्ह्याचा तपास नाशिक शहर पोलीस गुन्हेशाखा युनिट-2 कडून करत असताना माहिती मिळाली की, अंबड पोलीस ठाणे हद्दीत दि.28 मार्च 2025 रोजी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास तक्रारदार घरी परिवारासह झोपलेले असतांना अज्ञातांनी जुन्या वादाचा राग मनात धरून त्यांच्या बिल्डींगच्या कम्पाऊंडमध्ये प्रवेश करून त्यांच्या दरवाजावर जोरजोरात लाथा मारून खिडकीच्या काचा व जाळी तोडुन घरासमोर असलेल्या कुंडी तसेच मोठी फरशी स्टाईल दरवाजावर मारून दहशत निर्माण केली. तसेच घरातील लोकांच्या जिवितास धोक्यात आणले अशी तक्रारदार यांनी फिर्याद दिल्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुरनं- 309/2025 भा.न्या.सं कलम 110, 333 324/4 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्यातील चार अनोळखी आरोपींचा दि.27 मे 2025 रोजी नाशिक शहर पोलीस गुन्हेशाखा युनिट-2 कडून शोध घेत असतांना पोह. चंद्रकांत गवळी यांना माहिती मिळाली की, शोध घेत असलेले चार अनोळखी आरोपींची नावे ‘अशी’ असून ते त्यांच्या राहत्या घराच्या परीसरात वावरत आहेत. मिळालेली माहिती त्वरित गुन्हेशाखा युनिट-2 चे सपोनि. हेमंत तोडकर यांना कळविली आणि त्यांच्या मार्गदर्शनात श्रेणी पोउपनि मुक्तारखान पठाण, पोह. नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, मनोज परदेशी, प्रकाश बोडके, अतुल पाटील, पोअं. प्रविण वानखेडे, जितेंद्र वजीरे यांचे पोलीस पथक तयार करून संशयित आरोपींच्या घरांच्या परीसरात शोध घेत त्यांना हुशारीने ताब्यात घेण्यात आले. त्यांची नावे व माहिती विचारली असता 1) रोहीत उर्फ मोडया राजेंद्र सुर्यवंशी, (वय 22) रा. सिध्दी रो.हाऊस नं-3, सेंट लॉरेन्स शाळेसमोर, समर्थनगर, सिडको, नाशिक. 2) भरत सुदाम साळवे, (वय 19) रा. भुमिका अपार्ट, वॉचमन रूम, सिटी गार्डनचे पाठीमागे, इंदिरानगर, नाशिक. 3) अनुज उर्फ करण प्रकाश देवरे, (वय 21) रा. श्रीजी रो.हाऊस नं-3, माउंट अॅन्ड ड्यू, हॉटेलचे मागे, पांडवलेणी जवळ, इंदिरानगर, नाशिक. 4) ऋतिक उर्फ रिंकु रामराव हिरे (वय 25), रा. केसुनिवास, फ्लॅट नं-3, रामेश्वर नगर, आनंद लॉन्ड्री जवळ, गंगापुर रोड, नाशिक. असे त्यांनी सांगीतले. गुन्ह्यासंबंधी चौकशी केली असता त्यांनी कबुली दिल्याने त्यांना पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाणे अंतर्गत MIDC पोलीस चौकीत हजर करण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री.प्रशांत बच्छाव, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-2 कडून करण्यात आली. पथकात सपोनि डॉ.समाधान हिरे, पोउपनि. यशवंत बेंडकोळी, सपोउनि सुहास क्षीरसागर, संजय सानप, प्रकाश महाजन, अतुल पाटील, वाल्मीक चव्हाण, यशवंत बेंडकोळी, सपोउनि. बाळु शेळके यांचा देखील समावेश होता.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!