फैजपूर –( सलिम पिंजारी) शहरातील मिल्लतनगर मज्जीतजवळ शेख नईम ऊर्फ नम्मा अब्दुल रहीम कुरेशी यांचे घरास लागुन पत्राचे शेड मध्ये अवैध रित्या गुरांची (गौवंश जातीचे प्राण्यांची) कत्तल करुन कत्तलखाना चालु आहे अशी बातमी मिळाल्याने फैजपुर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे व पोलीस स्टाफ यांनी सदर बातमीचे ठिकाणी फैजपुर शहरातील मिल्लतनगर भागात जावुन सापळा लावुन दोन पंचासमक्ष सदर ठिकाणी खात्री करुन छापा टाकून तीन संशयितांना ५२,००० रुपये किंमतीचे मुददेमालासह ताब्यात घेतले.
सविस्तर वृत्त असे की,फैजपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांना गुप्तबातमीदारा मार्फतीने बातमी मिळाली होती की,फैजपुर शहरातील मिल्लतनगर मज्जीतजवळ शेख नईम ऊर्फ नम्मा अब्दुल रहीम कुरेशी यांचे घरास लागुन पत्राचे शेड मध्ये अवैध रित्या गुरांची (गौवंश जातीचे प्राण्यांची) कत्तल करुन कत्तलखाना चालु आहे अशी बातमी मिळाल्याने फैजपुर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे व पोलीस कर्मचारु यांनी सदर बातमीचे ठिकाणी फैजपुर शहरातील मिल्लतनगर भागात जावुन सापळा लावुन सदर ठिकाणी खात्री करुन दिनांक २/४/२०२५ रोजी छापा टाकला असता सदर ठिकाणी संशयित आरोपी ईकराम शेख नईम कुरेशी वय २१ रा. मिल्लतनगर, फैजपुर, वसीम शेख अब्दुल रहीम कुरेशी वय ४६ रा. कुरेशी मोहल्ला फैजपुर, ता. यावल तसेच शेख मुस्तकीम शेख कलीम वय ४० रा. कुरेशी मोहल्ला फैजपुर हे तिघेजण मिळून आले.
सदरील छापा ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना ३९,६०० रु. किं.चे गौवंश जातीचे जनावराचे मांसचे तुकडे सुमारे २२० किलो वजनाचे. ५०० रु.कि.चे बैलाचे (गौवंश जातीचा) चामडे सुमारे २३ किलो वजनाचे कि.अं.१४०० रु. किं.चे तराजु काटा व वजन मापे जुवाकिअं. ३०० रु.कि.ची मांस तोडण्यासाठीची एक लोखंडी कु-हाड, २०० कि.चा मांस कपण्याचा एक लोखंडी सुरी, व १०,००० रु.कि.चा एक लाल रंगाचा जिवंत गो-हा (गौवंश जातीचा) अशा एकुण ५२,००० रुपये किंमतीचे मुददेमालासह मिळुन आलेले असुन पोलीसांनी सदर ठिकाणी पशु वैदयकीय अधिकारी यांना बोलावुन तपासणी करीता मिळालेल्या मांसचे सॅम्प्ल काढुन उर्वरीत मांस जमिनीत पुरुन नाश करण्यात आले.पोहेकॉ रविंद्र काशिनाथ मोरे यांनी दिल्याने फिर्यादीवरून फैजपुर पोलीस स्टेशनला गु.,र.न.१३५/२०२५ महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ (क) व ९ (अ) तसेच प्राण्यांना क्रुरतेने वागवीण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० चे कलम ११ (१), (एच) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि. रामेश्वर मोताळे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप निरीक्षक विनोद गाभणे हे करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते,उप विभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांचे मार्गदर्शाना नुसार स.पो.नि.रामेश्वर मोताळे, पो.उप निरी.विनोद गाभणे,अरुण नमायते,रविंद्र मोरे,सलीम तडवी,अनिल पाटील.मोती पवार, देवेंद्र पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, मपोहेकॉ मदिना तडवी,समाधान पाटील, प्रशांत चिरमाडे, राहुल नावकर तसेच होमगार्ड यांनी केलेली आहे.






















