Homeआरोग्यदेवळा येथे सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या; सात महिन्यापूर्वी झाले होते लग्न!

देवळा येथे सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या; सात महिन्यापूर्वी झाले होते लग्न!

देवळा येथे सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या; पतीसह चौघांना पोलीसांकडून अटक..

पोलीस वार्ता, देवळा : लग्न होऊन फक्त सात महिने झाले असताना सासरच्या जाचाला कंटाळून एका नवविवाहितेने आपले जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना देवळा नगरपंचायत हद्दीतील इंदिरानगर येथे घडली आहे. दुचाकी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत, या मागणीसाठी वारंवार मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागल्याने नव विवाहितेने आत्महत्या केली असल्याची तक्रार नवविवाहितेच्या नातेवाईकांनी देवळा पोलिसात दिल्याने या प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

देवळा पोलीस ठाण्यात शंकर वसंत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अंबिका मयुर पवार (वय १९, रा. इंदिरा नगर, देवळा) हिच्यावर सासरच्या मंडळींकडून पैशासाठी वारंवार छळ केला जात होता. पती मयुर अंबादास पवार, सासू निर्मला अंबादास पवार, सासरे अंबादास पंडित पवार आणि नणंद पिंकी अंबादास पवार यांनी संगनमत करून अंबिकाला माहेरहून २०,००० रुपये आणण्यासाठी तगादा लावला होता. पैसे न मिळाल्याने तिला वेळोवेळी शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करण्यात येत होती. ३१ मार्च रोजी अंबिकाला मारहाण करून घरातून हाकलून दिले होते अशाप्रसंगी शेजारी राहणाऱ्या आपल्या आईकडे गेली आणि १ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता अंबिकाने आपल्या आईच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आई सखुबाई हिने पाहताच तात्काळ दरवाजा तोडून तिला खाली उतरवले व उपचारासाठी सटाणा येथील रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने तिला नाशिक येथे हलवण्यात आले, मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. देवळा ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर शवविच्छेदन करण्यात आले.

या प्रकरणी फिर्यादी शंकर वसंत पवार (वय ३२, रा. इंदिरा नगर, देवळा) यांच्या तक्रारीवरून पतीसह चौघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ८०, ८५, ११५(२), ३५२, ३५१(२), (३), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पुढील तपास देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील करीत आहेत.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी : आदिनाथ ठाकूर दहिवड, देवळा
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी तपास वेगात; आरोपींकडून घटनास्थळी पुनर्रचना, उर्वरित तिघांचा शोध सुरू

0
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...

बोरखेडा हत्याकांडातील आरोपीला दुहेरी फाशी

0
१०४ पानी निकालात आरोपीच्या क्रौर्यावर न्यायालयाचे ताशेरे; भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा भुसावळ : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बोरखेडा येथील चार निष्पाप भावंडांच्या...

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद

0
व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्Paragraphया हल्ल्यानंतर तरुणाचा...

error: Content is protected !!