Homeआरोग्य'आंतरराष्ट्रीय महिला दिन' विशेष; माणुसकी फाउंडेशन कडून 'समतादूत मंगला मोरे' यांना 'रणरागिणी'...

‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ विशेष; माणुसकी फाउंडेशन कडून ‘समतादूत मंगला मोरे’ यांना ‘रणरागिणी’ पुरस्काराने गौरविण्यात येणार..

‘माणुसकी फाउंडेशन’ यांच्या सौजन्याने ‘रणरागिणी’ 🏆पुरस्कार व सन्मान’ सोहळा, दिनांक 9 मार्च 2025, रविवार रोजी निफाड येथे आयोजित केला आहे..

पोलीस वार्ता, बारामती : संयुक्त राष्ट्रांनी पहिल्यांदाच 1975 साली ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा केला होता. दोन वर्षांनंतर, 1977 मध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने सर्व सदस्य देशांना बोलावले आणि ‘8 मार्च’ हा दिवस ‘महिला हक्क दिन’ म्हणून घोषित केला. त्यालाच ‘जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय महिला दिन’ असेही म्हणतात. तेव्हा पासून दरवर्षी 8 मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करून महिलांच्या हक्कांना आणि समानतेला प्रोत्साहन देत त्यांच्या कर्तुत्वावर प्रकाश टाकला जातो. महिला आज पुरुषांच्या बरोबरीने विविध क्षेत्रांमध्ये आपले नाव लौकिक करत आहे आणि समाजातील इतर महिलांपुढे एक आदर्श ठरत आहे. त्यामुळेच ‘जागतिक महिला दिना’ चे औचित्य साधून विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ज्यात अशा कर्तुत्ववान महिलांना पुरस्कार, सन्मान देऊन गौरविण्यात येते.

यंदा 2025 मध्ये ‘जागतिक/आंतरराष्ट्रीय महिला दिन’ निमित्त देखील मोठ्या प्रमाणावर विविध कार्यक्रमांचे आयोजन संपूर्ण जगभरात केले आहेत. महिलांना सामाजिक, आर्थिक व राजकीय दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी या कार्यक्रमांच्या माध्यमातून भर दिला जातो. असाच कार्यक्रम नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील ‘माणुसकी फाउंडेशन’ यांच्या सौजन्याने ‘🏆रणरागिणी’ पुरस्कार व सन्मान’ सोहळा, दिनांक 9 मार्च 2025, रविवार रोजी आयोजित केला आहे. कार्यक्रमाची वेळ- दुपारी 3 वाजता असून, ठिकाण- मार्केट कमिटी सभागृह, निफाड आहे. या विशेष कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी सिने अभिनेते संजय खापरे हे उपस्थित राहणार आहेत.
”रणरागिणी पुरस्कार व सन्मान’ सोहळा 2025 यात गौरविण्यात येणाऱ्या महिलांची नावे जाहीर झाली असून नाशिक येथे राहणाऱ्या व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या शासकीय विभागात समतादूत पदावर कार्यरत असलेल्या ‘श्रीमती मंगला अर्जुन मोरे’ यांना यंदा ”रणरागिणी पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येणार आहे.
  • कोण आहे श्रीमती मंगला मोरे, त्यांचे कार्य काय?

नाशिक येथे राहणाऱ्या या ‘रणरागिणी’चे पूर्ण नाव श्रीमती मंगला अर्जुन मोरे असे आहे. शिक्षण: M.A (समाजशास्त्र) असून सध्या त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या नाशिक येथील शासकीय कार्यालयाअंतर्गत समतादूत पदावर कार्य करत आहे. परंतु त्यांना इथपर्यंत पोहोचण्यासाठी बरेच संघर्ष करावे लागले. विवाहानंतर वयाच्या 21 व्या वर्षीच दोन मुलांची जबाबदारी एकटीच्याच खांद्यावर पेलवत आयुष्याशी संघर्ष चालू ठेवला, हालाकीच्या परिस्थिती दिवस जगताना पुढे पतीच्या निधनानंतर अवघ्या 2 महिन्यातच मुलाचा मोठा अपघात झाला. एक दुःख सावरत नाही की, दुसरा दुःखाचा डोंगर समोर उभा होता. अश्या कठीण दिवसात देखील परिश्रम घेउन तीन वर्षातच मुलाला पुन्हा त्याच्या पायावर उभे केले.
जीवन प्रवास करतांना आर्थिक अडचणी व मुला बाळांचे पालनपोषण करण्यासाठी वेळ प्रसंगी दुकानात काम केले. परिस्थिती ओळखून विवाहानंतर ही जमेल तसे शिक्षण सुरू ठेवले आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून स्वतःला सक्षम करण्याचा प्रयत्न केला. पुढे पतीचा आधार नसताना ही परिस्थितीशी संघर्ष करत शिक्षण पूर्ण करून शिक्षणाच्या जोरावर नोकरी मिळवली. ‘बार्टी’ या शासकीय संस्थेच्या अंतर्गत काम करत असताना, ‘समाजसेवा हीच नोकरी’ हा उद्देश मनी ठेवून समाजकार्यात या ‘रणरागिणी’ने स्वतःला वाहून घेतलं, त्यांनी केलेली समाज उपयोगी कार्ये..

  • RTE मार्फत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत आरटीई फॉर्म भरून देणे.
  • आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देत सुरुवात स्वतःच्या घरातूनच केली.. बहिण, भाचे, पुतणे यांचे विवाह आंतरजातीय केलेत.
  • अंगणवाडीत 5 वर्षे गरीब मुलांना मोफत शिक्षण दिले.
  • बार्टीमार्फत आयोजित MPSC, UPSC, IBPS परीक्षांसाठी मार्गदर्शन केले.

  • विधवा व निराधार महिलांसाठी पेन्शन योजना सुरू करून देण्यास त्यांना मदत केली.
  • अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसनमुक्ती मोहिमांमध्ये सहभाग नोंदवला.
  • लोकमत समूहाच्या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग.
  • झोपडपट्टी भागात जाऊन जनजागृती मोहीम राबविल्या.

  • स्वच्छता मोहिमांचे आयोजन व अंमलबजावणी.
  • महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी उत्सवांद्वारे समाजसुधारकांचे विचार प्रसारित करण्याचे कार्य केले.
  • व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता अभियान यामध्ये सक्रीय सहभाग घेतला.

आयुष्याचे पुस्तक जगत असताना या ‘रणरागिणी’ने तिच्या आयुष्यात आजवर जे समाजसेवेचे योगदान दिले आहे. त्याला प्रोत्साहन म्हणून आणि तिच्या कामाची दखल म्हणून नेहमीच तिला सामाजिक संघटनांकडून पुरस्काराने गौरवण्यात येते. आज माणुसकी फाउंडेशनच्या वतीने पुन्हा एकदा या समाजसेविकेला, समतादूताला, लोकसेविकेला, कर्तुत्ववान महिलेला ”रणरागिणी” पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कता इशारा!

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन.. पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 18.04.2026...

“बुरहानपुर पुलिस का अनोखा अभियान

0
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त” बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट): महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...

जल गंगा संवर्धन अभियान

0
प्रभारी मंत्री श्री सिलावट ने किया हसनपुरा तालाब गहरीकरण कार्य का शुभारंभ प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने ग्रामीणजनों के बीच बैठकर किया संवाद बुरहानपुर/18 अप्रैल,...

error: Content is protected !!