Homeआरोग्यसाहित्यरत्न 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे' शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी 20 जुलैपर्यंत अर्ज करू शकता!

साहित्यरत्न ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे’ शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी 20 जुलैपर्यंत अर्ज करू शकता!

इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमात सन 2024-25 मध्ये 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थी..

पोलीस वार्ता, नाशिक : साहित्यरत्न ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे’ विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय नाशिकमार्फत मातंग समाज व त्यातील 12 पोटजातीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी 20 जुलैपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक ताराचंद कसबे यांनी दि.11 जुलै, 2025 रोजी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
मातंग समाज व त्यातील 12 पोटजातीतील़़ इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमात सन 2024-25 मध्ये 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थी-विद्यार्थिनींना गुणवत्तेनुसार व उपलब्ध निधीनुसार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड, फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा अथवा बोनाफाईड प्रमाणपत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
  • मातंग समाजात अंतर्भाव असणाऱ्या पुढील 12 पोट – जातीतील व्यक्तींना अर्थसहाय्य करण्यात येते..

(1) मांग (2) मातंग (3) मिनी-मादींग (4) मादींग (5) दानखणी मांग (6) मांग महाशी (7) मदारी (8) राधे मांग (9) मांग गारुडी (10) मांग गारुडी व शासन निर्णय संकीर्ण – 2012/क्र.31 महामंडळे दिनांक 22 मे 2012 नुसार (11) मादगी (12) मादिगा ह्या दोन पोट जाती समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.
सदर कागदपत्रे दोन प्रतीत अर्जासोबत जोडून अर्जासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालय नाशिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नासर्डी पुलाजवळ, नाशिक-पुणे रोड, नाशिक या पत्त्यावर 20 जुलैपर्यत पाठवावेत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 0253 2236081 या दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!