भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील हॉटेल प्रीमियम जवळ सार्वजनिक जागी दोन इसम सट्टा बंद असतांना सुद्धा अवैधरीत्या सट्टा जुगार स्वीकारतांना पोलिसांना मिळून आले.पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून
त्यांच्या कब्जातुन २२४० रुपये रोख व सट्टा जुगारांचे साहित्य जप्त केले.
शहरातील अवैध धंदे ता.२६ जानेवारी पर्यत बंद करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे गुन्हेगारी शहरातून संपवण्यासाठी एक ठोस पाऊल उचलून पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते.पोलीस प्रशासनाने कारवाई न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलनाचा ईश्र्वही देण्यात आला होता. या पाश्वभूमी वर पोलीस प्रशासनाने अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली असून जामनेर रोडवरील हॉटेल प्रीमियम जवळ सार्वजनिक जागी संशयित रवींद्र रामचंद्र दांईजे राहणार जाम मोहल्ला व योगेश शंकर जाधव राहणार बद्री प्लॉट भुसावळ या दोघांना सट्टा बंद असतांना लोकांकडून पैसे स्वीकारून सट्टा जुगाराचे खेळ खेळतांना मिळून आले.पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या कब्जातुन २२४० रुपये रोख व सट्टा जुगार साहित्य जप्त केले.पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई ही सतत सुरू राहणार आहे.सोपान पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला ता.२९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कर्मचारी तेजस पारीसकर करीत आहे.या कारवाईमुळे अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले आहे.

























