Homeखेळशिर्डीत 'कार्यगौरव पुरस्कार’ सन्मान सोहळा संपन्न! नाभिक समाजातील लेखक-दिग्दर्शक यांना उल्लेखनीय कार्यासाठी...

शिर्डीत ‘कार्यगौरव पुरस्कार’ सन्मान सोहळा संपन्न! नाभिक समाजातील लेखक-दिग्दर्शक यांना उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कार मिळाला

यंदाचा प्रतिष्ठित ‘कार्यगौरव पुरस्कार’ मराठी चित्रपट लेखक-दिग्दर्शक सुदर्शन दिलीप खडांगळे यांना त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला..

पोलीस वार्ता, शिर्डी : महाराष्ट्र नाभिक महामंडळ, उत्तर अहिल्यानगर, शिर्डी नाभिक संघटना आणि समता पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ‘कार्यगौरव पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन 31 मार्च 2025 रोजी साई संत सेना महाराज मंदिर, कनकुरी रोड, शिर्डी येथे संपन्न झाले. नाभिक समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या वेळी गौरव करण्यात आला. यंदाचा प्रतिष्ठित ‘कार्यगौरव पुरस्कार’ मराठी चित्रपट लेखक-दिग्दर्शक सुदर्शन दिलीप खडांगळे यांना त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला हा पुरस्कार भाजपचे युवा नेते व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे आणि दैनिक लोकआवाजचे संपादक विठ्ठल लांडगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

  • प्रेरणादायी प्रवास आणि यशाची कहाणी..

सुदर्शन खडांगळे यांनी आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पुरस्कार स्वीकारताना ते म्हणाले – “हा पुरस्कार माझ्या मेहनतीचा आणि जिद्दीचा सन्मान आहे. मला मिळालेला हा सन्मान माझ्या अडचणीच्या काळात मदतीला धावून आलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीला अर्पण करतो, जे या प्रवासात माझ्या सोबतीला होते आणि आहेत.”
  • तरुणांसाठी संदेश आणि नवी घोषणा 

खडांगळे यांनी या सोहळ्यात नव्या चित्रपट प्रोजेक्टची घोषणा केली. ते म्हणाले – “मराठीत अनेक नवोदित कलाकार आहेत, पण त्यांना संधी मिळत नाही. मी 2025 या वर्षातील माझ्या निर्मितीतील चित्रपटात नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे.”

  • लेखक सुदर्शन खडांगळे यांचा भावनिक आभार प्रदर्शन संदेश..

महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ, उत्तर अहिल्यानगर, शिर्डी नाभिक संघटना आणि समता पतसंस्था यांचे मनःपूर्वक आभार! काही क्षण शब्दांच्या चौकटीत बसत नाहीत, ते फक्त अनुभवले जातात. आज माझ्या नाभिक समाजाने मला “कार्यगौरव पुरस्कार” देऊन केवळ माझ्या कार्याचा सन्मान केला नाही, तर माझ्या मेहनतीला, संघर्षाला आणि स्वप्नांना नवी दिशा दिली आहे. त्यासाठी हे 2025 वर्ष माझ्या नेहमीच लक्षात राहील. हा पुरस्कार केवळ एक सन्मानपत्र किंवा ट्रॉफी नाही; तो माझ्यासाठी जबाबदारीची नवी शिदोरी आहे. “हा माझ्या जिद्दीचा, मेहनतीचा आणि समाजाच्या ऋणात असण्याचा सुवर्णाक्षरांनी कोरलेला ठसा आहे.” हा पुरस्कार माझ्यासाठी एका नव्या प्रवासाची सुरूवात आहे, या पुढे कधी ही अपयशाचे ढग माझ्यावर दाटून आले, तरीही हा सन्मान मला नव्या आशेचा सूर्य नेहमीच दाखवत राहील. अंधाराच्या छायेतही हा पुरस्कार मला जिंकण्याची नवी जिद्द देईल. माझ्या समाजाने दिलेल्या या कार्यगौरव प्रेरणेचा मी सदैव ऋणी राहीन. त्याचबरोबर,माझ्या सर्व मित्रपरिवाराचे, तसेच माझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे विशेष आभार! सोशल मीडियाद्वारे, फोन कॉलद्वारे, संदेशाद्वारे तसेच वेगवेगळ्या माध्यमांतून आपण दिलेल्या अमूल्य शुभेच्छांमुळे माझा हा आनंद द्विगुणित झाला. आपण वेळ काढून दिलेल्या प्रोत्साहनपर शुभेच्छांसाठी मनःपूर्वक धन्यवाद! हे प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहोत, हीच अपेक्षा.

  • पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती..

या कार्यक्रमात नाभिक समाजातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, उद्योग, आरोग्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीत – डॉ. सुजय विखे पाटील, काका कोयटे, विठ्ठल लांडगे यांच्यासह, सयाजीराव झुंजार, दत्ताशेठ अनारसे, रामदास पवार, घनश्याम वाघ, विकास मदने, संजय गायकवाड, शांताराम राऊत, नारायण यादव, आप्पा सूर्यवंशी, अरुण सैदाणे, नंदकुमार मोरे आदींचा सहभाग होता. याशिवाय नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे, बाळासाहेब व्यवहारे, सुनील गायकवाड, शशिकांत सोनवणे, काकासाहेब वाघमारे, अनिल कदम, संजय जायबाहार, वैभव बिडवे आणि माधव जाधव यांनी देखील या कार्यक्रमास उपस्थिती लावली.
  • समारोप – एक प्रेरणादायी प्रवास सुरूच राहो!

सुदर्शन खडांगळे यांनी आपल्या प्रामाणिक प्रयत्नांनी, सातत्याने केलेल्या मेहनतीने आणि समाजाभिमुख दृष्टिकोनातून मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा प्रवास असाच यशाच्या दिशेने चालू राहो, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

✍️पोलीस वार्ता संपादक: उमेश फिरके, नाशिक, संपर्क : 9637519059
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

संत गोरोबा काका की मनाई जन्म जयंती

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे)  जिले के ग्राम बहादरपुर में संत गोरोबा काका कि जन्म जयंती पुजन कर महीलाओं सहीत गणमान्य नागरिकों ने भी संत गोरोबा काका...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित (रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...

error: Content is protected !!