प्रतिबंधीत पानमसाला व सुगंधीत तंबाखू-गुटखा अवैद्य विक्रीसाठी पेठरोड कडुन नाशिककडे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती..
पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरातील चोरी, घरफोड्या तसेच प्रतिबंधीत अंमली व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि अवैधपणे वाहतुक करणारे व विविध गुन्ह्यातील फरार सराईत गुन्हेगारांचा तपास करून कारवाई करण्याचे आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक साहेब यांनी शहर पोलीस गुन्हेशाखा विभागाला दिले आहेत.
त्यानुसार नाशिक शहर पोलीस गुन्हेशाखा युनिट-1 कडून तपास करत असताना दि. 14 जून 2025 गुन्हे शाखेचे पोअं. मुक्तार शेख यांना गोपनीय माहीती मिळाली की, एक बोलरो पिकअप गाडी क्र- एम.एच. 15 एफ.व्ही 2751 असा असून यामध्ये प्रतिबंधीत पानमसाला व सुगंधीत तंबाखू(गुटखा) अवैद्य विक्रीसाठी पेठरोड कडुन नाशिककडे येणार अशी खात्रीशीर माहिती मिळताच सदर बातमी वपोनि. मधुकर कड यांना कळविली असता त्यांनी पोउपनि. चेतन श्रीवंत, पोह. रमेश कोळी, पोअं मुक्तार शेख, राहुल पालखेडे, राम बर्डे, जगेश्वर बोरसे, नितीन जगताप, समाधान पवार यांचे पथक तयार करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
माहिती प्रमाणे पेठरोड, तवलीफाटा, नाशिक येथे सापळा लावून संबंधित महिंद्रा कंपनीची बोलरो पिकअप दिसताच तिला थांबवून झडती घेतली असता त्यात प्रतिबंधीत असलेला पानमसाला व सुगंधीत तंबाखू(गुटखा) अवैद्य विक्रीसाठी नेत असल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव विचारले वैभव सुनिल क्षिरसागर, (वय-25) रा. मुपो उमराळे बुद्रक ता.दिडोरी जि.नाशिक असे सांगितले. त्यानंतर पिकअपमधील बेकायदेशीर पणे विक्रीसाठी नेत असलेला एकुण 5,45,644/- रु. किंमतीचा तंबाखू(गुटखा) माल जप्त करण्यात आला आहे. सदरचा गुटखा त्याने सुतारपाडा, राज्य गुजरात येथुन नाशिक मध्ये आणल्याबाबत सांगितले. त्यामुळे 7.00,000/-रूपये किंमतीचा महिंद्रा कंपनीचे बोलरो पिकअप वाहन व प्रतिबंधित असलेला पानमसाला व सुगंधी तंबाखू(गुटखा) असा एकुण 12,45,644/-रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोह. रमेश कोळी यांनी फिर्याद देवुन सदर गुन्हेगाराविरूध्द म्हसरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास म्हसरूळ पोलीस करत आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री.प्रशांत बच्छाव, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-1 कडून करण्यात आली. पथकात सपोनि. हिरामण भोये, रोहिदास लिलके, योगीराज गायकवाड, धनंजय शिंदे, देविदास ठाकरे, मपोह. शर्मिला कोकणी, अनुजा येलवे, सुकाम पवार यांचा देखील समावेश होता.
✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल
नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं
विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित
बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक..
पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...