Homeआरोग्यविधानसभा निवडणूक 2024; मतदारांना मतदानासाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी सुटी जाहीर!

विधानसभा निवडणूक 2024; मतदारांना मतदानासाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी सुटी जाहीर!

संस्था, आस्थापनांनी मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत द्यावी..

पोलीस वार्ता, नाशिक | महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदारांना प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुटी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने दिला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
देशाने लोकशाही पद्धती स्वीकारली असून 18 वर्षांवरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेवून लोकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून भरपगारी सुटी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासांत योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र, मागील काही निवडणुकांमध्ये संस्था, आस्थापना भरपगारी सुटी किंवा सवलत देत नाहीत. त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित राहावे लागते. हे लोकशाहीसाठी घातक आहे. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून लोकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार पुढील सूचना देण्यात आल्या आहेत.
निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रामधील कोणत्याही व्यवसायात, व्यापारात, औद्योगिक उपक्रमात किंवा इतर कोणत्याही आस्थापनेमध्ये कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला, मतदानाच्या दिवशी सुटी दिली जाईल. ही सुटी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहील. मंजूर झालेल्या सुटीच्या कारणास्तव अशा कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही. अशा व्यक्तीला दिवसासाठी सामान्यत: वेतन मिळणार नाही या आधारावर कामावर ठेवले असेल, तरीही त्याला सुटी दिली नसती, तर त्याचे काढले असते, असे वेतन त्याला अशा दिवसासाठी दिले जाईल.
एखाद्या नियोक्त्याने उपकलम एक किंवा दोनच्या तरतुदींचे उल्लंघन केले, तर असा नियोक्ता निवडणूक आयोगाच्या नियमानुसार शिक्षेस पात्र असेल. हे कलम अशा कोणत्याही मतदाराला लागू होणार नाही, ज्यांच्या अनुपस्थितीमुळे तो ज्या रोजगारामध्ये गुंतला आहे, त्या रोजगाराच्या संदर्भात धोका किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी आदींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल, तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र, याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील.
उद्योग विभागांतर्गत येणारे सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्म आदींच्या आस्थापनांनी वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरीता योग्य ती सुटी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास संबंधितांविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ऑर्ट ऑफ़ लिविंग के नियमित गुरुवार सत्संग के 18 वर्ष पूर्ण

0
उन्नीस वें वर्ष में होगा प्रवेश आज राजस्थानी भवन में होगा महासत्संग बैंगलोर के बाद सारे विश्व मे नियमित सत्संग के लिए बुरहानपुर की विशिष्ट...

शासकीय कार्य में बाधा डालने वाला फरार आरोपी महाराष्ट्र से गिरफ्तार

0
नेपानगर । शासकीय कार्य में बाधा उत्पन्न करने तथा कर्मचारियों को धमकाने के मामले में फरार चल रहे आरोपी को नेपानगर पुलिस ने महाराष्ट्र...

भोपाल : मंत्रि-परिषद बैठक में ₹5,960 करोड़ की योजनाओं को मंजूरी

0
शिक्षा, किसान और महिला कल्याण पर विशेष जोर भोपाल : मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव की अध्यक्षता में आयोजित मंत्रि-परिषद की बैठक में प्रदेश के सर्वांगीण...

जाट समाज धर्मशाला ओंकारेश्वर के नवीन भवन का भूमि पूजन संपन्न

0
काटकूट ( सुरज दहे ) ओंकारेश्वर में सोमवार, 22 जून को श्री जाट समाज धर्मशाला के नवीन भवन निर्माण हेतु भूमि पूजन कार्यक्रम विधि-विधान के साथ...

योग दिवस पर सरस्वती शिशु मंदिर में योग साधना का आयोजन, पत्रकार गोपाल देवकर...

0
दीप प्रज्वलन एवं सरस्वती वंदना के साथ हुआ शुभारंभ, विद्यार्थियों को नियमित योग अपनाने का दिया संदेश बुरहानपुर। अंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर सरस्वती...

error: Content is protected !!