Homeउद्योगवणी-वरोरा महामार्गावरील ट्रक आणि दुचाकी अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू..

वणी-वरोरा महामार्गावरील ट्रक आणि दुचाकी अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू..

अपघाताची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविला..

पोलीस वार्ता, यवतमाळ : वणी-वरोरा महामार्गावरील संविधान चौक येथे एका मालवाहू ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दि.5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सविस्तर वृत्त असे की, गणेश बदकी, वय 26, रा.मारेगाव, ता.मारेगाव, जि.यवतमाळ हा आपल्या खाजगी कामानिमित्त वणी येथे आला होता. आपले काम आटोपून तो गावाकडे परतत असताना वणी-वरोरा महामार्गावरील संविधान चौकाजवळ आला यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू ट्रकने, नंबर- सीजी 04 पीएच 0520 त्याच्या दुचाकीला एमएच 29 एबी 1563 जोरदार धडक दिली. या जबरदस्त अपघातात गणेश बदकी हा तरुण रस्त्यावर जोरात आपटला गेला आणि गंभीर जखमी झाला. अपघात इतका भीषण होता की, त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. यावेळी अपघातस्थळी जमलेल्या नागरिकांनी महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत चिंता व्यक्त केली. अपघातग्रस्त ट्रक चालकाने घाबरून न पळता तो थेट वणी ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, या अपघाताच्या घटनेचा प्राथमिक तपास पोलीस जमादार संतोष आढाव करीत आहेत.
महामार्गावरील अपघातांची वाढती मालिकेला कारण वणी-वरोरा महामार्गावरील वाहनांचा अतिवेग आहे, त्यात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आणि ट्रकचालकांची बेफिकिरी यामुळे निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. वणी यथील संविधान चौक परिसरात याआधीही अनेक अपघात झाले असून स्थानिक नागरिकांनी वाहतूक पोलिसांकडे अधिक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अपघातामुळे गणेश बदकी या तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!