तालुक्यातील आकपुरी येथे एका शेतकऱ्याचा खून झाला तर दुसऱ्या घटनेत कोरटा येथे 50 रुपयांच्या क्षुल्लक व्यवहारातून खून करण्यात आला..
पोलीस वार्ता, यवतमाळ : जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन खुन झाल्याचे समोर आले आहे. शनिवारी, दि.14 जून रोजी सायंकाळी तालुक्यातील आकपुरी येथे एका शेतकऱ्याचा खून झाला तर दुसऱ्या घटनेत कोरटा येथे शुक्रवार दि.13 जून रोजी 50 रुपयांच्या क्षुल्लक व्यवहारातून खून करण्यात आला.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सुधाकर महादेव बोटरे वय-45, हे धानोरा येथे राहत असून त्यांची शेती आकपुरी येथे आहे. ते शनिवारी दि.14 जून 2025 रोजी आपल्या शेतात जात असताना बाजूच्या शेतकरी रमेश कुळसंगे याने रस्त्यात कांटे टाकून ठेवले होते यावरून दोघांमध्ये वाद होऊन तो विकोपाला गेला या दरम्यान कुळसंगे याने हातातील लोखंडी कुऱ्हाडीने सुधाकर बोटरे वर हल्ला केला आणि त्यांना गंभीर जखमी केले. परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेने त्यांना तेथून तत्काळ शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
तर उमरखेड तालुक्यातील कोरटा येथील खुनाच्या घटना शुक्रवार दि.13 जून 2025 रोजी दुपारी घडली. दत्ता बरगे नामक तरुणाचा माधव तोरकड ह्या त्याच्या मित्रासोबत क्षुल्लक 50 रुपयांच्या व्यवहाराचा देण्या-घेण्यावरून वाद झाला होता. यावेळी बरगेने गोदाजी यांना शिवीगाळ केल्याच्या रागातून त्यांच्या मुलाने बरगेला जोरदार ढकलले. यामुळे दत्ता बरगे हा डोक्यावर कोसळून गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला होता.
या दोन्ही घटना वेगवेगळ्या असून यातील दोन्ही आरोपींना तालुका पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास उमरखेड पोलीस करत आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार..
पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल
नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं
विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित
बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...