Homeआरोग्यम्यानमारसह थायलंडला भूकंपाचे धक्के; 700 जणांचा मृत्यू.. बाजूच्या पाच देशांनाही सौम्य प्रमाणात...

म्यानमारसह थायलंडला भूकंपाचे धक्के; 700 जणांचा मृत्यू.. बाजूच्या पाच देशांनाही सौम्य प्रमाणात धक्के..

म्यानमारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या मंडाले शहरापासून 17.2 किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाचे लागोपाठ सात धक्के बसले..

पोलीस वार्ता, नवी दिल्ली : म्यानमारमधील स्थिती अत्यंत कठीण बनली आहे. देशातील गृहयुद्धाच्या संकटात सापडलेल्या म्यानमारवासीयांना भूकंपाच्या प्रलयकारक संकटाचा सामना करावा लागला आहे. शुक्रवारी आलेल्या 7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे 700 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर 1670 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासनानुसार 30 लाखांहून अधिक नागरिक विस्थापित झाले आहेत, ज्यामुळे आणखी मोठे मानवी संकट निर्माण झाले आहे. हे संकट म्यानमारसाठी एक अत्यंत गंभीर आव्हान ठरले आहे, ज्यामुळे या देशातील स्थिरता आणखी खालावली आहे.

म्यानमारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या मंडाले शहरापासून 17.2 किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाचे लागोपाठ सात धक्के बसले, त्यापैकी 7.7 (रिष्टर स्केल) तीव्रतेचा सर्वात मोठा धक्का होता. भूकंपानंतर म्यानमार व थायलंडमध्ये अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत, घरे उद्ध्वस्त झाली आहेत. शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकले असून ठिकठिकाणी बचाव मोहिमा चालू आहेत. दुभंगलेले रस्ते, उघडलेले महामार्ग, कोसळलेले पूल असे चित्र भूकंपग्रस्त भागांत दिसत आहे. म्यानमारमधील लष्करशाहीने भूकंपानंतर सहा प्रांतांत आणीबाणीची घोषणा केली आहे.
यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, भूकंपाची खोली 10 किलोमीटर होती आणि त्याच्या पश्चात 6.4 तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला. यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. म्यानमार आणि थायलंडने देशभरात आणीबाणी जाहीर केली आहे, कारण या भूकंपाचा प्रचंड परिणाम होण्याच्या शक्यतेमुळे त्या दोन्ही देशांमध्ये गोंधळ माजला आहे. म्यानमार आणि थायलंडने देशभरात आणीबाणी
म्यानमारच्या शेजारी असलेल्या चीनच्या युनान प्रांतातही भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले, पण तिथे सध्या कुठलीही मोठी जीवितहानी झालेली नाही. मात्र, युनान प्रांतात काही मालमत्तेचं नुकसान झाल्याची शक्यता आहे आणि या नुकसानाबद्दल तपास सुरू आहे. या भूकंपीय संकटामुळे संपूर्ण क्षेत्रात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
या भूकंपाची तीव्रता इतकी प्रचंड होती की म्यानमारच्या शेजारील देशांमध्ये, जसे की बांगलादेश, लाओस, चीन आणि भारतातही धक्के जाणवले. भारताच्या मणिपूर आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले, पण सुदैवाने भारतात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भूकंपामुळे म्यानमार व थायलंडमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. मोदी म्हणाले, “अडचणीच्या प्रसंगी भारत या दोन्ही देशांच्या बरोबर उभा आहे. दोन्ही देशांना लागेल ती मदत करण्यास भारत तयार आहे.” भारताने तत्काळ म्यानमार आणि थायलंडला मदत पाठवली आहे.
म्यानमारमध्ये, विशेषतः सागाइंगपासून 16 किलोमीटर उत्तर-पश्चिमेकडे, 7.7 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र 22.01 उत्तर अक्षांश आणि 95.92 अंशांवर स्थित होते. या भूकंपामुळे या परिसरात मोठे नुकसान झाले आहे, आणि मदतीची आवश्यकता अधिकाधिक वाढली आहे.

✍️पोलीस वार्ता संपादक: उमेश फिरके, नाशिक, संपर्क- 9637519059
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!