Homeउद्योगमेळघाटातील अंजनगाव वनपरिक्षेत्रात एका मृत्यू झालेल्या वाघाचे तीन पंजे कापून नेल्याची धक्कादायक...

मेळघाटातील अंजनगाव वनपरिक्षेत्रात एका मृत्यू झालेल्या वाघाचे तीन पंजे कापून नेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

घटनेचा तपास सुरू असून, वाघाच्या मृत्यूच्या कारणावरून संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली एक पथक गठीत करण्यात आले.

पोलीस वार्ता, अमरावती | मेळघाटातील अंजनगाव वनपरिक्षेत्रात मंगळवारी 26 नोव्हेंबर रोजी एका वाघाचा मृत्यू झाला. या मृत्यूची तपासणी सुरू असताना, वाघाचे तीन पंजे कापून नेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाघाचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटना सायंकाळी पांढरा खडक वर्तुळ अंतर्गत वनकर्मचारी गस्तीवर असताना 1032 वस्तापूर नियत क्षेत्रांतर्गत घडली. गस्ती पथकाने वाघाच्या मृत्यूबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली, आणि त्वरित अंजनगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी.पी.बावनेर, सहाय्यक वनसंरक्षक चव्हाण आणि उपवनसंरक्षक अग्रिम सैनी घटनास्थळी पोहोचले.
मात्र, सूर्यास्त झाल्यामुळे अंधार पडला, त्यामुळे पुढील तपासणीसाठी वाघाच्या मृतदेहावर पाळत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. या घटनेचा तपास सुरू असून, वाघाच्या मृत्यूच्या कारणावरून संशय व्यक्त केला जात आहे.
बुधवारी 27 नोव्हेंबर सकाळी मेळघाट जंगलात एक वाघ मृत अवस्थेत आढळला, आणि त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली एक पथक गठीत करण्यात आले, ज्यात मानद वन्यजीव रक्षक प्रा.डॉ.सावंन देशमुख, स्टैंडिंग फॉर टायगर फाउंडेशनचे अल्केश ठाकरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रशेखर धनगर, पशुधन विकास अधिकारी डॉ.एस.आर.टाले यांचा समावेश होता.
शवविच्छेदनाचे नेतृत्व उपवनसंरक्षक अग्रीम सैनी आणि सहाय्यक वनसंरक्षक चव्हाण अंजनगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी.पी.बावनेर यांनी केले. वाघाच्या शरीराचे काही नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले आहेत. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल, अशी माहिती सैनी यांनी दिली.
वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असं सांगितले असले तरी, मृत वाघाचे तीन पंजे कुऱ्हाडीनं कापून नेण्यात आल्याचं समोर आलं आहे. एक पंजा फक्त दोन नखांसह आढळला, जे दर्शवितं की, वाघाचे पंजे कापून नेणारे आरोपी उद्दिष्टे साधण्यासाठी त्यांना काढून नेले होते. वाघाचे पंजे कापून नेणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.
या प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत क्राईम सेल आणि पोलिसांच्या समन्वयानं तपास केला जाईल, अशी माहिती उपवनसंरक्षक अग्रीम सैनी यांनी दिली.

✍️पोलीस वार्ता प्रतिनिधी: अशोक वस्तानी, अमरावती.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

error: Content is protected !!