Homeक्राईममारेगाव येथील युवकाची निबांच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या! अधिक तपास पोलीस करीत...

मारेगाव येथील युवकाची निबांच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या! अधिक तपास पोलीस करीत आहे..

मृत युवकाचे नाव मारोती अंबादास आत्राम असे असून तो किराणा दुकानात काम करत होता आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.

पोलीस वार्ता, यवतमाळ | मारेगाव येथील वार्ड क्र.2 मधील एका 32 वर्षीय विवाहित तरुणाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत युवकाचे नाव मारोती अंबादास आत्राम असे असून तो किराणा दुकानात काम करत होता आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. झालेल्या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेली माहीती अशी की, यवतमाळ, ता.मारेगाव येथे आज दि.5 डिसेंबर 2024 गुरूवारी रोजी, सकाळी सुमारे 9 वाजेच्या सुमारास गावातील युवक नाव मारोती अंबादास आत्राम यांने मारेगाव येथील जुन्या कोर्टामागील, राज्य महामार्गाशेजारी असलेल्या निबांच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही बातमी क्षणार्धात मारेगाव भर पसरली आणि घटनास्थळी नागरिकांची तोबा गर्दी झाली.
मृत मारोती याने रात्री उशिरा गळफास घेतला असावा. असे प्रथमदर्शी दिसून आले. घटनास्थळी एक वही सापडली असून त्यात आत्महत्येचे संभाव्य कारण लिहिलेले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तथापि, पोलीस अधिक तपास करत आहेत. मृत मारोती आत्राम यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. घराचा आधारवड गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांनी सांगितले की, मारोती आत्राम शांत स्वभावाचा व मेहनती होता. त्याने असे टोकाचे पाऊल का उचलले? पोलीस घटनास्थळी मिळालेल्या सुसाईड नोट्स वरून तपास करत आहे. मारोती आत्राम याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
पोलिसांकडून गावातील नागरिकांशी चर्चा करून, मारोती यांच्या आयुष्यातील संभाव्य ताणतणावांचा शोध घेतला जात आहे. मारोतीच्या आकस्मिक मृत्यूने मारेगावकर शोकाकुल झाले आहेत. मृत मारोतीच्या कुटुंबावर असलेले आर्थिक ताण आणि समाजातील अडचणी यामुळे त्याने आत्महत्या केली असावी, अशी चर्चा गावात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

error: Content is protected !!