Homeआरोग्यमानव कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या प्रथम वर्धापनदिनी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार...

मानव कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या प्रथम वर्धापनदिनी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार आणि सन्मान!

‘पत्रकार भास्कर साळवे’ हे दक्ष न्यूज महाराष्ट्र राज्य आणि दैनिक आपलं महानगर यांचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत..

पोलीस वार्ता, नाशिक : समाजात वावरत असताना केलेल्या चांगल्या कामाची नेहमीच प्रशंसा कुठे ना कुठे होत असते, आणि सामाजिक संघटनांकडून देखील अशा व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन वेळोवेळी त्यांना सन्मानित करून प्रोत्साहन दिले जाते. याच सामाजिक उद्देशाने मानव कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने आपल्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यासाठी दि.15 जून 2025, रविवारी रोजी नाशिक येथे कार्यक्रम आयोजित केला होता.
संस्थेने वर्धापन दिनाचे औचित्य साधून सामाजिक, कला-क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, समाज प्रबोधन, व्यावसायिक तसेच भारतीय संविधान मूल्य प्रचारक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड करून त्यांचा गौरव व सत्कार यावेळी केला. यातलेच एक सन्मानित व्यक्ती ‘पत्रकार भास्कर सखाराम साळवे’ ज्यांना संस्थेने वर्ष 2025 ‘मानव कल्याण पुरस्कार’ व सन्मानचिन्ह देऊन गौरविले आहे. भास्कर साळवे हे दक्ष न्यूज महाराष्ट्र राज्य आणि दैनिक आपलं महानगर यांचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.

  • पत्रकार भास्कर साळवे यांचा परिचय..

नाशिकमधील भगुर गाव येथील रहिवासी भास्कर साळवे यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपली 10 वर्ष दिली असून त्यांनी यासोबत समाजसेवेची जोड ही ठेवली आहे. समाजातील गरीब आणि गरजू व्यक्तींना शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना न्याय मिळण्यासाठी आपल्या पत्रकारितेच्या लेखनितून आवाज उठवला आहे. भास्कर साळवे‌ यांनी पत्रकारितेबरोबरच विविध सामाजिक आणि राजकीय पदे भूषवली असून ते आजही कार्यरत आहे.
भास्कर साळवे यांची कारकीर्द..
  • भगुर नगरपालिकेच्या माध्यमातून स्थापन भुकंप निधी संकलन समितीचे माजी सदस्य,
  • देवळाली कॅम्प पोलीस ठाणे शांतता समिती, माजी सदस्य,
  • महाराष्ट्र शासन पोलीस आयुक्तालाय शांतता समिती, माजी सदस्य,
  • नियुक्त विशेष कार्यकारी अधिकारी,
  • जिल्हा सचिव दलित विकास महासंघ नाशिक आणि दिव्यांग सेवा भावी संस्था, माजी सदस्य,
  • प्राथमिक विद्या मंदिर विद्यालय भगुर, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष,
  • ति‌.झ.विद्या मंदिर, पालक शिक्षक संघ भगुर, माजी उपाध्यक्ष,
  • नुतन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ देवळाली कॅम्प, सदस्य.
  • भगुर नगर पालिका पर्यावरण समिती सदस्य,
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भगुर शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नाशिक तालुका अध्यक्ष,
भास्कर साळवे यांनी राजकीय, सामाजिक पदावर काम करत असताना राज्य शासनाच्या विविध योजना ज्यात महिला व बाल कल्याण विभाग योजना, समाज कल्याण विभाग योजना, संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना, वृद्धापकाळ योजना, विधवा योजना, घरकुल योजना, सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंतांसाठी पेन्शन योजना, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना आशा प्रकारच्या योजना गरजू पुरुष व महिलांपर्यंत पोहचवून त्यांचा प्रचार केला. आणि योजनांचा लाभ मिळावा यासाठी गरजूंना मार्गदर्शन ही केले.

सामाजिक समाजसेवेसाठी भास्कर साळवे यांना..
  • नाशिक तालुका मराठी पत्रकार संघ अध्यक्ष सुधाकर गोडसे आणि माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते ‘कार्य गौरव पुरस्कार’ मिळाला आहे.
  • दलित आदिवासी क्रांती दल संस्थापक विनोद भोसले यांनी कोविड योद्धा हा पुरस्कार दिला आहे.
  • श्री.संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त संजय सुर्यवंशी यांच्या हस्ते संत रोहिदास महाराज ‘कार्य गौरव पुरस्कार’ मिळाला आहे.
  • आदर्श सैनिक फाऊंडेशन स्वा.विर सावरकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती भगुर, यांच्यावतीने सन्मानित केले गेले आहे.

तसेच विविध सामाजिक संस्थांनी व राजकीय पक्षांच्या वतीने भास्कर साळवे‌ यांचा सन्मान करुन गौरव केला आहे. आता मानव कल्याण बहुउद्देशीय संस्थेने देखील वर्ष 2025 ‘मानव कल्याण पुरस्कार’ देऊन ‘पत्रकार भास्कर साळवे’ यांचा मानसन्मान वाढवला आहे. संस्थेच्या प्रथम वर्धापन वर्ष 2025 या कार्यक्रम प्रसंगी आमंत्रित पाहुणे माजी जिल्हाधिकारी बी.जी.वाघ, माजी न्यायाधीश अनिल वैद्य, मा.क.ब.संस्थेचे अध्यक्ष टी.वाय.जाघव तसेच मानवतावादी बहूउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष शिवदास म्हसदे, जेष्ठ सामाजिक व विचारवंत करुणा सागर पगारे आणि भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष के.के.बच्छाव गुरुजी यांच्या हस्ते आणि उपस्थितीत ‘मानव कल्याण पुरस्कार’ साळवे यांना देण्यात आला.
‘पत्रकार भास्कर साळवे’ हे बहुजन लोककल्याण समिती, महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून ते या संस्थेच्या माध्यमातून आजही समाजातील नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांच्या या सेवेला व कार्याला पोलीस वार्ता कडून देखील शुभेच्छा!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!