Homeआरोग्यमहाराष्ट्रात पुढील दोन दिवसांमध्ये राज्यातील विविध भागांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला...

महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांमध्ये राज्यातील विविध भागांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात आज 20 ऑक्टोबर रोजी पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण या भागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस..

पुढील दोन दिवस राज्याच्या विविध भागात तुरळक व जोरदार पाऊस..
पोलीस वार्ता, ठाणे | भारतातून मान्सून माघारी फिरल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. असे असताना महाराष्ट्रात आज 20 ऑक्टोबर पासून पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने हवामानात बदल झाला असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे कोकणसह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. राज्यात आज 20 ऑक्टोबर रोजी पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण या भागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता सांगण्यात आली आहे.
IMD भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याचे वर्तवले आहे..
भारतीय IMD ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून उन्हाचा पारा वाढलेला दिसतोय. मात्र, काल 20 ऑक्टोर रोजी दुपारपासून काही भागात ढगाळ वातावरणासह जोरदार पाऊस पडल्याने उन्हाची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली आहे. दरम्यान संध्याकाळच्या वेळेला कडाक्याच्या विजांसह राज्यभरात मोठा पाऊस झाला. शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

‘यलो अलर्ट’ जारी..

महाराष्ट्रात हवामान खात्याने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, कोकण विभागात, तसेच गोव्याच्या किनारपट्टीवर अतिरिक्त पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. गोव्यातही पावसाच्या तुरळक सरी अजूनही बरसत आहेत.

मराठवाड्यात दोन दिवस पाऊस

20 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड व धाराशिव जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह वाऱ्याचा वेग अधिक ताशी 30 ते 40 कि.मी. असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात 22 ऑक्टोबरपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून करण्यात आली आहे.

हवामान विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला

हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पशुधनास गोठ्यात सुरक्षित आणि चांगली व्यवस्था करावी. त्यांना पाणीचे पाणी स्वच्छ द्यावे. फुल पिकात खुरपणी करून तण नियंत्रण करावे. फुल पिकास आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. लांब दांड्यांच्या फुलाची उदा.गुलाब, काढणी करतांना कळी उमलण्याच्या अवस्थेत असताना काढणी करावी तर झेंडू, आष्टूर या सारख्या फुलांची काढणी पूर्ण उमलल्याच्या नंतर करावी, असा मोलाचा सल्ला हवामान विभागाने सल्ला दिला आहे. पिकांची काढणी केल्यावर सुरक्षित आणि कोरड्या जागी ठेवण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.

पोलीस वार्ता न्यूज प्रतिनिधी: दिनेश पाटील,ठाणे
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळात गोवंश कत्तल प्रकरण उघड ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

0
भुसावळ - शहरातील आगाखान वाडा परिसरातील कत्तलखान्यात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि. ९ मे २०२६) सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी दोघांविरुद्ध...

भुसावळात मोटारसायकल चोरटा जेरबंद ; दोन दुचाकी जप्त

0
भुसावळ - शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी भुसावळ शहर पोलीस स्टेशनकडून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांना यश मिळाले असून मोटारसायकल चोरी करणाऱ्या...

खडका रोडवरील घरफोडीत दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

0
भुसावळ - शहरातील खडका रोड परिसरातील लाल बिल्डिंगजवळ मयूर जाधव व मिलिंद जाधव यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे १ लाख ५० हजार...

भुसावळात अज्ञात चोरट्यांकडून इंजिन चोरी

0
भुसावळ : शहरातील शिवाजी नगर पोस्ट ऑफिस परिसरात उभी असलेली जुनी वापरातील ऑटो रिक्षाची इंजिन चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कैलास...

माजी राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते काळाराम मंदिरात धर्मध्वज उभारणी सोहळा संपन्न!

पंचधातूपासून तयार धर्मध्वजस्तंभावर 11" 5 फूट आकाराचा भगवा ध्वज असून मान्यवरांच्या हस्ते धर्मध्वज फडकविण्यात आला.. पोलीस वार्ता, नाशिक : येत्या सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर...

error: Content is protected !!