Homeउद्योगभुसावळ शहरात पूर्ववैमनस्यातून चाकू हल्ला; दोघे संशयित जेरबंद

भुसावळ शहरात पूर्ववैमनस्यातून चाकू हल्ला; दोघे संशयित जेरबंद

दोन इसमांनी पूर्ववैमनस्यातून रिजवान शेख रहीम याच्यावर चाकूने मानेवर व पाठीवर सपासप पाच वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे..

पोलीस वार्ता, भुसावळ : शहरातील जाम मोहल्ला भागातील शालिमार हॉटेल जवळील डी.डी.सुपर कोल्ड्रिंक्स अँण्ड टी हाऊस दुकानांमध्ये तैरींम अहमद व नासिर अहमद ऊर्फे मस्तान शेख दोघे सव्वासात वाजेच्या सुमारास चहा पित असतांना पाच ते सहा इसमांनी तैरींम अहमद यास बंदुकीने गोळ्या झाडून त्याचा खून केल्याची घटना 10 जानेवारी 2025 रोजी घडली होती. या मागील घटनेची पुनरावृत्ती करून ‘खून का बदल खून’ या उद्देशाने पापा नगर भागातील गैसिया नगर कब्रस्थान येथे सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास श्रद्धांजली अर्पण करून येत असताना कब्रस्थानच्या गेट समोर दोन इसमांनी पूर्ववैमनस्यातून रिजवान शेख रहीम याच्यावर चाकूने मानेवर व पाठीवर सपासप पाच वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना दि.31 मार्च रोजी घडली असून एल सी बी व बाजारपेठ ठाण्याचे पथकांनी संयुक्त कारवाई करीत दोघांना जेरबंद केले.
सविस्तर वृत्त असे की, खडका रोड भागातील इदगाह येथे मुस्लिम समाज बांधब ‘रमजान ईद सणा’निमित्त मोठ्या संख्याने एकत्र येऊन नमाज पठण करतात. यानंतर आपले पूर्वजांकडून झालेले गुन्ह्याची माफी मागण्यांसाठी पापा नगर भागातील गैसिया नगर कब्रस्थान येथे श्रद्धांजली(फातिमा) अर्पण करतात. यादरम्यान रिजवान शेख रहीम हा युवक साडे दहा वाजेला फातिमासाठी कब्रस्थान मध्ये आल्याची माहिती मुख्य आरोपी दानिश माया ऊर्फे अकिल शेख (वय-19) तसेच जकीरीया ऊर्फे बाबा शेख जुनेस गैस (वय-24) या दोघांना मिळाली. कब्रस्थानच्या गेट बाहेर दोघे पाळत ठेवून होते. रिजवान गेट समोर येताच दोघांनी त्याच्या मानेवर व पाठीवर चाकूने वार करून जबर जखमी केले. यावेळी रिजवान रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. रुग्णवाहिकेतून जखमीला ग्रामीण रुग्णालय ट्रामा केअर सेंटरला येथे प्राथमिक उपचार करून जळगांव येथे खाजगी रुग्णालयात हलविले. चाकूने वार केल्याने रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाला होता. जखमी रिजवानची प्रकृती गंभीर असून पोनि. राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने एल सी बी पथकाचे पोलीस कर्मचारी सचिन पोळ, गोपाल गव्हाळे, कमलाकर बागुल,गजानन देशमुख,त्याचप्रमाणे बाजारपेठ ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील विजय नेरकर, योगेश माळी, महेश चौधरी, सचिन चौधरी, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, प्रशांत सोनार, अमर आढाळे, भूषण चौधरी यांच्या पथकाने संयुक्तरीत्या कारवाई करून आरोपींना घटनेच्या एक तासात अटक करून बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

✍️पोलीस वार्ता संपादक: निलेश फिरके, भुसावळ, संपर्क: 09960333469
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!