Homeउद्योगभुसावळ शहरात गॅस रिफिलिंग सेंटरवर छापे; 25 सिलेंडर जप्त!

भुसावळ शहरात गॅस रिफिलिंग सेंटरवर छापे; 25 सिलेंडर जप्त!

भुसावळ शहरात गॅस रिफिलिंगच्या अवैध्य व्यवसायांवर पोलिसांचे छापे, मुद्देमाल हस्तगत करत कारवाई..

पोलीस वार्ता, भुसावळ : शहरात अनेक भागांमध्ये बऱ्याच दिवसांपासून गॅस रिफिलिंगचा अवैध्य व्यवसाय बिनधास्तपणे सुरू असल्याची पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी दि.17 जानेवारी 2024 रोजी दुपारच्या वेळेस बाजारपेठ पोलीस ठाणे तसेच शहर पोलीस ठाणे हद्दीत एकाच वेळी दोन छापे मारून कारवाई केल्याने गॅस रिफिलिंग करणाऱ्यांमध्ये हडकंप माजला आहे. या कारवाईमध्ये दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून 25 गॅस सिलेंडर/टाक्या, दोन रिफिलिंग मशीन, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा तसेच एक रिक्षा वाहन पोलिस कारवाई जप्त करण्यात आले.

सविस्तर माहिती अशी की, शहर बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील पांडुरंग टॉकीज जवळील राहुल नगर भागात गॅस रिफिलिंग व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळाली त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बागुल, सोपान पाटील, भूषण चौधरी यांना माहिती देत कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे तहसील विभागाचे पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे व पुरवठा अधिकारी रोशन रेवतकर या दोघांना पोलीस स्टेशनला बोलवले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथक व महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले असता एक इसम रिक्षा क्रमांक (एम.एच.19 ए.ई.9944) मध्ये मशीन व्दारे गॅस रिफिलिंग करतांना मिळून आला. सदरील इसमास पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एच.पी.कंपनीचे 20 गॅस सिलेंडर टाकी, एक रिफिलिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, एक रिक्षा वाहन असे 46 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून बाजारपेठ पोलीस ठाणे येथे जमा केला आहे. तसेच गॅस रिफिलिंग कारवाई मधील रिक्षा बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या आवारात लावली आहे. तर दुसरी कारवाई शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये यावल रोडवरील बल्लू गॅरेज समोर सार्वजनिक जागी पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 5 गॅस सिलेंडर टाक्या, एक रिफिलिंग मशीन असे साहित्य जप्त करून शहर पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आले आहे. दोन्ही  पोलीस ठाण्यात कारवाईचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

✍️पोलीस वार्ता टीम : भुसावळ
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!