Homeआरोग्यभाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल; कुणबी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य भोवले!

भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल; कुणबी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य भोवले!

वणी भाजपचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी भाजप कार्यकर्त्याने कुणबी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे वृत..

पोलीस वार्ता, यवतमाळ: वणी येथील भाजप महायुतीचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी भाजप कार्यकर्त्याने कुणबी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. या घटनेचे तीव्र पडसाड वणीसह यवतमाळ जिल्ह्यात, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यातही दिसून आले. यामुळे ऐन निवडणुक प्रचाराच्या वेळी भाजपची कोंडी झाली.
मंगळवारी शेकडो कुणबीबांधव वणी पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कार्यकर्त्याविरूद्ध गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी लावून धरली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी भाजप कार्यकर्ता सुधीर साळी याच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. येथील भाजपचे विद्यमान आमदार तथा उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी व भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी याप्रकरणी सारवासारव करत, असा प्रकार घडलाच नाही, असे सांगून घटनेचे खंडन केले आहे. मात्र सध्या वणी विधानसभा मतदारसंघात या प्रकाराने वातावरण ढवळून निघाले असून, या कुणबीबहुल मतदारसंघात भाजपची ऐन निवडणूक प्रचाराच्या दरम्यान कोंडी झाली आहे.
उमेदवार बोदकुरवारांच्या कार्यालयात सोमवारी भाजप कार्यकर्ता साळीचा कुणबी समाजाच्या एका कार्यकर्त्याशी वादविवाद झाला होता. यावेळी साळीने कुणबी समाजाबद्दल कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला. अशी माहिती एका कार्यकर्त्याने भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यास दिल्यानंतर या पदाधिकाऱ्याकडून साळीला बेदम मारहाण झाल्याचे कळले. मात्र साळीने कोणाविरूद्धही तक्रार केलेली नाही. परंतु साळीने एक पत्रक प्रसिद्ध करून कार्यक्रमाच्या आयोजनावरून एका कार्यकर्त्याशी शाब्दिक वादविवाद झाल्याचे सांगितले. आपण कुणबी समाजाविरोधात कोणतेच आक्षेपार्ह वक्तव्य केलेले नाही, असे त्याने या पत्रकात म्हटले आहे.

वणीचे मा.नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी घटनास्थळी मध्यस्थी करून हा वादविवाद संपवला. नंतर भाजपचे मा.केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनीही कार्यकर्त्यांना समज दिल्याचे कळले. झालेल्या घटनेला आता राजकीय वळण लागले असून समाज माध्यमांवरून हे प्रकरण पसरल्यानंतर कुणबी समाज बांधवांनी मंगळवारी रात्री बैठक घेतली. वासुदेव विधाते, राघवेंद्र कुचनकार, जगदीश ढोके, मंगेश रासेकर, अशोक चिकटे आदी शेकडो कुणबी समाजबांधवांनी वणी पोलीस ठाण्यात पोहचून संबंधित आरोपीस अटक करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. वासुदेव विधाते यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी सुधीर साळी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
  • राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप?

आता भाजपने घडलेल्या घटनेवर सारवासारव केली आहे. साळी या भाजप कार्यकर्त्याच्या विधानामुळे भाजपची अडचण झाल्याचे लक्षात येताच महायुतीचे उमेदवार बोदकुरवार यांनी तातडीने पत्रकार परिषद घेवून, भाजपच्या प्रचार कार्यालयात असा कुठलाच प्रकार घडला नाही. दोन कार्यकर्त्यांत केवळ धक्काबुक्की, वादविवाद झाला होता. पण कोणत्याही समाजाविरूद्ध कोणीही आक्षेपार्ह बोललेले नाही. या घटनेशी भाजप पक्षाचा कुठलाच संबंध नसून हा प्रकार आपल्याविरूद्ध राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप बोदकुरवार यांनी केला. हीच प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी पत्रकारांना बोलताना थोडक्यात दिली.

✍️पोलीस वार्ता प्रतिनिधी: नरेश ठाकरे, यवतमाळ
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!