मा.श्री.पोलीस अधीक्षक सातारा, व मा.अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांचे हस्ते 79 हजार रुपयांचे रोख बक्षीस वाटप..
पोलीस वार्ता, सातारा(लोणंद) : लोणंद पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री सुशिल बी. भोसले सहा. पोलीस निरीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे दुय्यम अधिकारी व अंमलदार यांनी दमदार कारवाई केली असुन मा. श्री समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व मा. डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांचे हस्ते लोणंद पोलीस स्टेशनला 79 हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले.
लोणंद पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर 472/2024 भा.न्या.सं.का. कलम 130 (1), 189 (2), 190, 191(2), (3) वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयातील आरोपींबाबत कोणत्याही प्रकारचा पुरावा नसताना सपोनि श्री सुशिल भोसले यांनी व त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बुध्दी कौशल्याचा वापर करुन फिर्यादी हाच आरोपी असल्याचे निष्पन्न करुन उर्वरीत आरोपी यांना काळज, नवी सांगवी, पिंपळे गुरव पुणे येथून वेगवेगळया ठिकाणाहुन अत्यंत शिताफीने ताब्यात घेवुन अटक केली आहे.
याकरीता मा. श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व मा. डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांचे हस्ते 25 हजार रुपयांचे रोख बक्षीस घेतले आहे.
लोणंद पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर 304/2024 भा.न्या.सं.का. कलम 137 (2), 34 (1), 65 (1), सह पोक्सो कलम 4, 8, 12 या गुन्हयात पिडीत हिस कोणी पळवुन नेले याबाबत कसलाही पुरावा नसताना सपोनि श्री सुशिल भोसले यांनी व त्यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बुध्दी कौशल्याचा वापर करुन पिडीतास शोधुन नातेवाईकांचे ताब्यात देवुन आरोपीस अत्यंत शिताफीने ताब्यात घेवुन अटक केली.
याकरीता मा. श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व मा. डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांचे हस्ते 25 हजार रुपयांचे रोख बक्षीस घेतले आहे.
लोणंद पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर 476/2024 भा.न्या.सं. कलम 309 (9), 3 ( 5 ) या गुन्हयात आरोपी रोहीत ऊर्फ टक्या चिवळया पवार रा. सुरवडी ता. फलटण, आकश ऊर्फ गमज्या ऊर्फ पप्या टेलरिंग भोसले रा. बोरी ता. खंडाळा, पायगुण खमखम भोसले रा. हळगाव ता. जामखेड हे सुरवडी येथुन पळुन जात असताना आर.सी.पी. 3 यांची मदत घेवुन नियोजनबध्द सापळा रचुन ऊसाच्या शेतातुन अत्यंत शिताफीने पकडले सदर आरोपींनी लोणंद, खंडाळा, फलटण शहर, भुईज पोलीस ठाणे हद्दीत 2 घरफोडी, 3 जबरी चोरी, 5 मोटार सायकली चोरी व इतर इलेक्ट्रीक मोटार चोरीच्या गुन्हयांची उकल करुन त्यांचेकडुन 6,85,700/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन उत्कृष्ट कामगिरी करत मा. श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व मा. डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांचे हस्ते 25 हजार रुपयांचे रोख बक्षीस घेतले.
तसेच लोणंद पोलीस स्टेशनला प्राप्त होणाऱ्या वॉरंटची जास्तीत जास्त बजावणी असल्याने त्याकरीता 2 हजार रुपये बक्षीस व पोलीस स्टेशनमध्ये दाखल होणाऱ्या मुद्देमालची जास्तीत जास्त निर्गती होत असल्याने त्याकरीता 2 हजार बक्षीस मा. श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व मा. डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांचे हस्ते लोणंद पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी पटकावुन सातारा जिल्हयात लोणंद पोलीस स्टेशनची दमदार कारवाई होत असल्याचा ठसा उमटवला आहे.
मा.श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व मा.डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी लोणंद पोलीस स्टेशनचे श्री सुशिल भोसले सहा. पोलीस निरीक्षक, विशाल कदम पोलीस उपनिरीक्षक, विष्णु धमाळ सहा. पोलीस फौजदार, पोलीस हवालदार नितीन भोसले, महेश टेकवडे, सर्जेराव सुळ, संतोष नाळे, पोलीस कॉन्स्टेबल केतन लाळगे. अभिजीत घनवट, गोविंद आंधळे, विठठल काळे या सर्वांना त्यांच्या उत्तम कामगिरी करिता कौतुक केले आहे.
✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी : स्वप्निल जावळे, सातारा
१०४ पानी निकालात आरोपीच्या क्रौर्यावर न्यायालयाचे ताशेरे; भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा
भुसावळ : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बोरखेडा येथील चार निष्पाप भावंडांच्या...
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...