Homeआरोग्यनिवडणूक आयोगाकडून नियुक्त निरीक्षकांचे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेवर राहणार लक्ष?

निवडणूक आयोगाकडून नियुक्त निरीक्षकांचे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेवर राहणार लक्ष?

खर्च निरीक्षकांचे आगमन! मुख्य निरीक्षक व पोलिस निरीक्षक लवकरच दाखल होणार..!

पोलीस वार्ता, नाशिक | महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता निवडणूक कार्यक्रम मा.भारत निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होईल. निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यात 22 ऑक्टोबर पासून नामनिर्देशन पत्र उमेदवारांना दाखल करता येईल. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक 29 ऑक्टोबर 2024 असा आहे. निवडणूक प्रक्रिया मुक्त, नि:पक्ष आणि निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाकडून परराज्यातील वरिष्ठ सनदी अधिकारी निवडणूक निरीक्षक म्हणून नेमण्यात आले आहेत. सर्वसाधारण निरीक्षक, खर्च निरीक्षक आणि कायदा व सुव्यवस्थेसाठी स्वतंत्र निरीक्षक निवडणूक निरीक्षक नेमण्यात आले आहेत. त्यांचे या सर्व निवडणूक प्रक्रियेवर लक्ष राहणार आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी कळविले आहे.
खर्च निरीक्षक हे निवडणूक लढविणा-या उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवून असतील. भरारी पथके, स्थिर पथके, छायाचित्रण संनिरीक्षण पथके / छायाचित्रण पाहणी पथके, तसेच सहायक खर्च निरीक्षकांच्या माध्यमातून मा.भारत निवडणूक आयोगाने विहीत केलेल्या मर्यादेत उमेदवारांचा खर्च होत आहे किंवा कसे या बाबत निरीक्षण नोंदवून तसे अहवाल मा.निवडणूक आयोगाकडे वेळोवेळी पाठवीत असतात. नाशिक जिल्ह्यात खर्च निरीक्षकांचे आगमन झाले आहे. खर्च निरीक्षकांनी जिल्ह्यातील संबंधित पथकांच्या बैठका घेऊन आवश्यक सूचना दिल्या आहेत.
सर्वसाधारण निरीक्षकांचे आगनम लवकरच होत असून ते विधानसभा मतदारसंघात उमेदवारांच्या नामनिर्देशन प्रक्रियेपासून ते मतमोजणीपर्यंत सर्व महत्वाच्या टप्प्यांवर प्रत्यक्ष उपस्थित राहून निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कामकाज मा.भारत निवडणूक आयोगाच्या दिशा निर्देशानुसार होत आहे किंवा कसे याबाबत वेळोवेळी त्यांचे अहवाल मा.निवडणूक आयोगास सादर करतील. मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ, मतदान अधिकारी/कर्मचाऱ्यांची दुसरी सरमिसळ, उमेदवारांच्या नामनिर्देशनाची छाननी प्रक्रिया, प्रत्यक्ष मतदानाचा दिवस, मतदानानंतर निवडनूक मतदान केंद्रांच्या सांविधानिक कागदपत्रांची छाननी, मतमोजणी व विजयी उमेदवाराची घोषणा या सर्व प्रसंगी उपस्थित राहून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे निरीक्षण करतील. तसेच सर्वसाधारण निरीक्षक हे सूक्ष्म निरीक्षकांच्या साहाय्याने संवेदनशील मतदान केंद्रांवर लक्ष ठेवतील.
आयोगाकडून कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिस विभागाकडील निरीक्षक देखील नेमण्यात आले आहेत. समाजातील विविध घटकांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग, जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था याबाबत आपले निरीक्षण अहवाल वेळोवेळी मा.निवडणूक आयोगाकडे पाठवतील. लवकरच पोलिस विभागाच्या मुख्य निरीक्षकांचे देखील आगनम होत आहे. एकंदरीत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उमेदवार/त्यांचे प्रतिनिधी तसेच यंत्रणांकडे तीनही निरीक्षक लक्ष ठेऊन असतील, असेही जिल्हाधिकारी श्री.शर्मा यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळात नगराध्यक्षांवर आरोप-प्रत्यारोप; प्रकरण न्यायप्रविष्ठ

0
भुसावळ : शहराच्या राजकीय वर्तुळात सध्या नगराध्यक्ष पदावरून आरोप-प्रत्यारोपांचा वाद चांगलाच तापला असून, लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री गौर भंगाळे यांनी आपल्याविरोधात खोटी माहिती पसरवली जात...

भुसावळ उपविभागातील लोक अदालतीत १०७ खटले निकाली ; ७७ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल

0
भुसावळ - जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवार, दिनांक ९ मे २०२६ रोजी 'लोक अदालतीचे' यशस्वी आयोजन करण्यात आले. या लोक अदालतीमध्ये भुसावळ...

भुसावळ भाजपा तर्फे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी

0
भुसावळ : क्रांतीसूर्य, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने वसंत टॉकीज जवळील महाराणा प्रताप चौक येथे अभिवादन कार्यक्रम...

शाहपुर में दूषित पेयजल को लेकर कांग्रेस पदाधिकारियों का आक्रोश….

0
रविंद्र महाजन के निर्देश पर नगर कांग्रेस कमेटी शाहपुर ने सौंपा ज्ञापन, स्वच्छ पेयजल एवं यात्री प्रतीक्षालय की मांग शाहपुर, बुरहानपुर। नगर परिषद क्षेत्र में...

ब्लैक स्पॉट पर बुरहानपुर पुलिस की सख्त कार्रवाई, 42 वाहन चालकों से ₹24,800 वसूले

0
बुरहानपुर -: सड़क दुर्घटनाओं में कमी लाने के उद्देश्य से बुरहानपुर पुलिस द्वारा विशेष यातायात चेकिंग अभियान चलाया गया। यह अभियान इंदौर-इच्छापुर हाईवे के...

error: Content is protected !!