Homeउद्योगनांदेपेरा ग्रामपंचायत शिपाई भरती परीक्षा गैरप्रकार; उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू..

नांदेपेरा ग्रामपंचायत शिपाई भरती परीक्षा गैरप्रकार; उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू..

वणी उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू, आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, योग्य निर्णय न घेतल्यास उपोषण आणखी तीव्र केले जाईल.

पोलीस वार्ता, यवतमाळ : वणी तालुक्यातील नांदेपेरा ग्रामपंचायतीत शिपाई पदासाठी 30 डिसेंबर 2024 रोजी घेतलेल्या लेखी परीक्षेत पारदर्शकतेचा अभाव आणि परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप परीक्षार्थ्यांनी केला आहे. यावरून नांदेपेरा पंचायत समिती प्रशासनाने योग्य दखल घेतली नाही, असा निषेध व्यक्त करत परीक्षार्थ्यांनी 15 जानेवारीपासून वणी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. परीक्षार्थ्यांचा आरोप आहे की, प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न करता योग्य उमेदवारांवर अन्याय करण्यात आले आहे.
गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिपाई पदाची परीक्षा घेतली गेली होती, परंतु परीक्षेतील गैरप्रकारांबद्दल कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही. उलट, गट विकास अधिकाऱ्यांकडूनच अहवाल मागवून परीक्षा प्रक्रियेत कोणताही दोष नसल्याचे सांगण्यात आले. परीक्षार्थ्यांचा आरोप आहे की, गट विकास अधिकारी स्वतः अहवाल मागवून सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत की या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी निष्पक्ष समिती नेमावी,
वणी, नांदेपेरा ग्रामपंचायतीत 30 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या शिपाई भरती परीक्षेतील गैरप्रकारांच्या निषेधार्थ परीक्षार्थ्यांनी विविध मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये:
  • शिपाई भरती परीक्षा तात्काळ रद्द केली जावी.
  • नवीन परीक्षेची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जावी.
  • लेखी परीक्षेनंतर तोंडी परीक्षा घेण्यात यावी.
  • परीक्षा प्रक्रियेत सहभागी संबंधित अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल्स तपासावेत.
  • परीक्षेचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करण्यात यावे.
  • परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
ही मागणी प्रशासनाने गांभीर्याने घेऊन योग्य कार्यवाही करावी, अशी परीक्षार्थ्यांची अपेक्षा आहे.
या शिपाई भरती परीक्षा संदर्भात सुरु असलेल्या उपोषणाच्या पहिल्याच दिवशी वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर, माजी आमदार वामनराव कासावर, अ.भा.आदिवासी संविधानिक हक्क परिषदेचे अध्यक्ष गीत घोष, किसान सभेचे राज्य कमिटी सदस्य ॲड. दिलीप परचाके, ॲड. विप्लव तेलतुंबडे, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख निखाडे आणि भाजपचे विजय पिदुरकर यांनी उपोषण स्थळी भेट देऊन परीक्षार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला.
आमदार संजय देरकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी फोनवर चर्चा केली, त्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अहवाल दिला असून परीक्षेत कोणताही गैरप्रकार झालेला नाही, असे सांगितले. मात्र, उपोषणकर्त्यांनी हा अहवाल फसवा असल्याचा आरोप केला आहे.
प्रशासनाचे जरी उपोषणाकडे दुर्लक्ष केले असले तरी अनेक नेत्यांनी आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला आहे. तथापि, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वणीला येऊनही त्यांनी उपोषण स्थळी भेट दिली नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
हे उपोषण सचिन चिकटे आणि प्रवीण खैरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले आहे. नांदेपेरा शिवसेना शाखा प्रमुख सुरेश शेंडे आणि युवासेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.
यावेळी परीक्षार्थी तुषार खामनकर, साहिल ठमके, अजय किन्हेकर, पवन कोडापे, राहुल वांढरे, धीरज खामनकर, प्रफुल पावले यांच्यासह अन्य काही परीक्षार्थी देखील उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, योग्य निर्णय न घेतल्यास उपोषण आणखी तीव्र केले जाईल. आता या आंदोलनावर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

error: Content is protected !!