आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित करण्यात आले. नव मतदारांमध्ये मतदान कसे करावे याबाबतीत जनजागृती करण्यात आली.
कर्म.रामरावजी आहेर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व देवळा नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन..
पोलीस वार्ता, देवळा | कर्म.रामरावजी आहेर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व देवळा नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हितेंद्र आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सर्व स्वयंसेवकांना येऊ घातलेल्या विधानसभा 2024 निवडणुकीत मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित करण्यात आले. नव मतदारांमध्ये मतदान कसे करावे याबाबतीत जनजागृती करण्यात आली. स्वयंसेवकांना शंभर टक्के मतदान करण्यासाठी शपथ देण्यात आली. आपापल्या कुटुंबातील सदस्यांना तसेच परिचित व्यक्तींना मतदान करण्यासाठी प्रेरित व मार्गदर्शन करावे अशा सूचना देण्यात आल्या. तसेच स्वयंसेवकांनी आपल्या आई-वडिलांना निवडणुकीत आपले कर्तव्य बजवावे म्हणून पत्र लिहिण्यास प्रोत्साहित करण्यात आले. यानिमित्ताने देवळा नगरपंचायतीच्या सौजन्याने सेल्फी पॉईंट तयार करून स्वयंसेवकांनी त्यात सेल्फी काढण्यामध्ये सहभाग घेतला. देवळा शहरांमध्ये मतदान जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य व रासेयो जिल्हा समन्वयक डॉ.डी.के.आहेर, उपप्राचार्य आर.एन.निकम, रासेयो +2 कार्यक्रम अधिकारी एस.आर.भामरे, पर्यवेक्षिका व सहा.कार्यक्रम अधिकारी एन.वाय.पाटील, सहा कार्यक्रम अधिकारी डी.एस.पवार, प्रा.अमित बोरसे, प्रा.राहुल पवार, टी.एस.देवरे, एम.सी.बच्छाव इतर प्राध्यापक व सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.
पोलीस दलातील धाडसी व उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाने 'राष्ट्रपती पदक' देऊन केले सन्मानित..
पोलीस वार्ता, देवळाली | महाराष्ट्र पोलीस दलातील नाशिक शहर पोलीस गुन्हे शाखा...
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के शाहपुर क्षेत्र के ग्राम पिपरी से खड़कोद तक निकली भव्य कावड़ यात्रा: गुप्तेश्वर महादेव मंदिर में पुजा-हवन के साथ संपन्न
बुरहानपुर।...
रमाकांत मोरे । मध्य प्रदेश जन अभियान परिषद जिला बुरहानपुर के विकासखंड बुरहानपुर एवं खकनार में मुख्यमंत्री सामुदायिक नेतृत्व क्षमता विकास पाठ्यक्रम का सत्रारंभ...