Homeउद्योगदुर्दैवी! भुसावळ येथील दोन तरुणांचा लोणावळा पवना धरणात बुडून मृत्यू, शिवदुर्ग रेस्क्यू...

दुर्दैवी! भुसावळ येथील दोन तरुणांचा लोणावळा पवना धरणात बुडून मृत्यू, शिवदुर्ग रेस्क्यू कडून मृतदेह दिले पोलिसांच्या ताब्यात..

भुसावळ येथील दोन तरुणांचा लोणावळा पवना धरणात बोट उलटून बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना..

पोलीस वार्ता, भुसावळ | भुसावळ शहरातील वरणगांव रोडवरील पद्मावती नगर भागातील राहणाऱ्या दोन तरुणांचा लोणावळा येथे पर्यटनासाठी गेले असता पवना धरणात बोट उलटून बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार दि.4 डिसेंबर 2024 बुधवार रोजी दुपारी 2 च्या सुमारास दुधीवरे (ता.मावळ) गावच्या हद्दीतील पवना धरण जलकुंभात घडली. सदरील बुडालेले दोन तरुणांचा मृतदेह शिवदुर्ग रेस्क्यू टीमकडून बाहेर काढण्यात आले असून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मयत झालेल्यांची नावे अनुक्रमे मयूर रवींद्र भारसाके (वय 25) व तुषार रवींद्र अहिरे (वय 24) असे आहेत. दोघे रा. भुसावळ, वरणगांव रोडवरील, पद्मावती नगर.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे बालेवाडी येथील स्केन रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड येथे नोकरीस असणारे आठ मित्र सकाळी मावळ तालुक्यात पर्यटनासाठी आले होते. ते दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास लोणावळा हद्दीतील पवना धरण परिसरात फिरण्यासाठी गेले. यावेळी ते बोटीतून धरणाच्या पाण्यात उतरले असता बोट उलटल्याने मयूर व तुषार पाण्यात बुडाले. यावेळी त्यांच्या मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र येथील पाण्याची खोली जास्त असल्यामुळे त्यांचे प्रयत्न असफल ठरले. त्यांनी या घटनेची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना दिल्यानंतर शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या वतीने येथे बुडालेल्या तरुणांचा शोध घेवून दोघांचा मृतदेह लोणावळा ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात दिला असून पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदरील घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे हवालदार जय पवार करीत आहे. मृत तरुणांची अंत्ययात्रा दि.6 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता त्यांचे राहत्या घरून वरणगांव रोडवरील, पद्मावती नगर येथून निघणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

✍️पोलीस वार्ता संपादक: निलेश फिरके, भुसावळ, संपर्क: 09960333469
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

error: Content is protected !!