Homeउद्योगचोपडा, अडावद पोलीस ठाण्याचे हवालदार यांचा रेल्वे अपघातात मृत्यू.. दोन दिवसांनी पटली...

चोपडा, अडावद पोलीस ठाण्याचे हवालदार यांचा रेल्वे अपघातात मृत्यू.. दोन दिवसांनी पटली मृतदेहाची ओळख!

टाकरखेडा-अमळनेर च्या मधील भागात अमळनेर नजीक मालधक्का रेल्वे पटरीवर एका ईसमाची चेहरा छिन्नविछिन्न अवस्थेत रेल्वे पोलिसांना बॉडी मिळून आली होती.

पोलीस वार्ता, जळगाव : चोपडा तालुक्यातील अडावद गाव पोलीस ठाण्याचे पो.कॉन्स्टेबल संजय आत्माराम पाटील (वय-51) यांचा दूर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समजल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून रेल्वे अपघातात चेहरा छिन्नविछिन्न परिस्थितीत असलेल्या मृतदेहाची ओळख आज नातेवाईकांकडून पटल्याने शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. या घटनेचे वृत्त चोपडयात पसरताच सर्वत्र शोककळा पसरली आहे.
याबाबत पोलीसांकडून प्राप्त माहिती अशी की, दि.12/12/2024 रोजी दु.4.30 वाजेच्या सुमारास टाकरखेडा-अमळनेर च्या मधील भागात अमळनेर नजीक मालधक्का रेल्वे पटरीवर एका ईसमाची बॉडी, चेहरा छिन्नविछिन्न अवस्थेत रेल्वे पोलीसांना मिळून आली. सदर बॉडी अमळनेर पोलीसांकडे सोपविण्यात आल्यानंतर बॉडीची ओळख पटविण्याचे काम सुरू झाले व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला. पोलीस तपास सुरू असतांनाच आज चोपडा शहर पोलीसात मिसिंग गुन्हा दाखल झाल्याने पोलीसांनी त्यांच्या नातेवाईकांकडे सदरील बॉडीची ओळख पटवून खात्री केली असता मयताचे कपडे व चप्पल वरुन ती पोलीस कॉ.संजय पाटील यांची बॉडी असल्याचे त्यांच्या पत्नीने ओळखले. यावरून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात जाऊन खात्री केली असता पत्नीने आपल्याच पतीचा मृत्यू देह असल्याचे स्पष्ट केले. यानंतर शवविच्छेदन होऊन बॉडी नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आलेली आहे. याबाबत अमळनेर रेल्वे स्टेशन मास्तर यांच्या खबरीवरून पोलीसात गु.र.नं क्रमांक 126/2024 अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.हे.कॉ गणेश पाटील हे करीत आहेत.
पोलीस कॉ.संजय पाटील हे चोपडा येथील महावीर नगरातील रहिवासी असून ते शांत व मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांनी चोपडा ग्रामीण पोलीस ठाणे, अमळनेर पोलीस ठाणे येथे शासकीय सेवा केली आहे. सध्या त्यांनी अडावद पोलीस ठाणे याठिकाणी देखील उत्कृष्ट सेवा बजावली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: विनायक पाटील, चोपडा
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!