भुसावळ शहरात वकीलांवर चाकू हल्ला
भुसावळ – शहरातील शहर पोलीस स्टेशन हद्दीतील श्री नगर भागातील वकील प्रवीण कोळी यांच्याकडे रावेर तालुक्यातील रझोदा गावातील गैरअर्जदार यांची केस होती.ती तडजोड करण्यासाठी गैरअर्जदार हे त्यांचे घरी पोहचले व तुमचे वकीलपत्र काढून घेण्यास सांगितले.कोळी यांनी नकार दिल्याने गैरअर्जदार यांना राग आला व त्यांनी चाकू काढून वकील व त्यांची आई या दोघांवर हल्ला केल्याची घटना ता.२५ रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान घडली.विकास शांताराम धांडे असे संशयितांचे नाव आहे.
खावटीची केस मध्ये गैरअर्जदार विकास धांडे यांच्या विरुद्ध अर्जदार वकील प्रवीण कोळी यांनी वकीलपत्र दाखल केले होते.सदरील केसची तडजोड करण्यासाठी गैरअर्जदार हर ता.२५ रोजी श्रीनगर भागात वकील प्रवीण कोळी यांच्या राहत्या घरी पोहचले.जर तुम्ही वकीलपत्र मागे नाही घेतले तर जीवठार मारेल अशी धमकी देत अश्लील शिवीगाळ केली.व खिच्यातून चाकू काढून वकील प्रवीण कोळी यांच्या हातावर वार केला बचाव करण्यासाठी आई आली असता गैरअर्जदार यांनी तिच्या सुद्धा हाताचे बोटावर चाकूने वार केला. याबाबत वकील प्रवीण कोळी यांनी शहर पोलीस स्टेशनला झालेल्या घटनेची संपूर्ण माहिती दिली.
नुकतेच शहर पोलीस हद्दीत एका युवकास त्याच्या राहत्या घरात सात ते आठ इसमांनी घुसून खून केल्याची घटना ही उघडा होताच एक वकीलास व त्याचे आईस गैरअर्जदार यांनी चाकू हल्ला केला.जणू एकप्रकारे पोलिसांचे वचक संपल्याने असे घटना घडत आहेत.

























