Homeक्राईमभुसावळमध्ये मध्यरात्रीच्या वादातून एकाचा मृत्यू

भुसावळमध्ये मध्यरात्रीच्या वादातून एकाचा मृत्यू

भुसावळ : भुसावळ शहरातील आनंदनगर-नेप कॉलनी परिसरात शनिवारी (दि. २८ फेब्रुवारी) मध्यरात्री झालेल्या शाब्दिक वादातून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अनिल उर्फ पिंटू आत्माराम सावकारे (वय ४२, रा. आनंदनगर-नेप कॉलनी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

प्राथमिक माहितीनुसार, रात्री साधारण १ वाजेच्या सुमारास सावकारे यांच्यात त्याच परिसरातील एका तरुणाशी वाद झाला. वाद चिघळल्यानंतर झाडाची सिमेंटची कुंडी डोक्यावर मारण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेत सावकारे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टम अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, बाजारपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ, शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुरावे जप्त केले असून मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले. संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या नाशिकरोड येथील ऐतिहासिक वास्तूला मंत्री संजय शिरसाट देणार भेट

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या या बंगल्याला राज्य शासनाने जतन व संवर्धन करावे.. पोलीस वार्ता, नाशिक | महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर सन 11 ऑक्टोबर 1935...

भुसावळ ते ठाणे NCB कनेक्शन

0
‘सोन्या’ला पहाटे ताब्यात घेत दिवसभर कसून चौकशी भुसावळ : खडका रोडवरील मोहम्मद अली रोड परिसरातून एजाज आयुब खान ऊर्फ ‘सोन्या’ यास ठाणे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या...

रावेरमध्ये शहरात घरफोडी करणारे आरोपी 24 तासांत गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात!

0
सीसीटीव्हीने शोध घेऊन आरोपींना अटक करून चोरीचे 50 हजार रोकड व तीन तोळे सोन्याचे दागिने जप्त.. पोलीस वार्ता, रावेर | शहरातील जुनी नगरपालिका रोड परिसरातील एका...

चोरट्यांचा खेळ खल्लास! घरफोडी करणारे पोलिसांच्या जाळ्यात…

0
पाच आरोपी अटकेत; ६ लाख १६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.. निंभोरा पोलिसांची कारवाई; मुंबईसह खिर्डी येथून आरोपी ताब्यात... रावेर/प्रतिनिधी.. दि.23 विनायक जहुरे रावेर तालुक्यातील खिर्डी येथील...

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीसह नणंदेला जन्मठेप

0
दोघांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड; दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद भुसावळ : चारित्र्याच्या संशयातून विवाहित महिलेची लाकडी ओंडक्याने मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी पतीसह...

error: Content is protected !!