Homeआरोग्यखिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयात 36 हजारांची लाच घेताना मुख्याध्यापिका व क्लर्क...

खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयात 36 हजारांची लाच घेताना मुख्याध्यापिका व क्लर्क धुळे एसीबीच्या जाळ्यात..

ही धक्कादायक घटना खिरोदा येथील जनता शिक्षण मंडळ संचलित, धनाजी नाना विद्यालयात घडली.. मुख्याध्यापिका मनीषा महाजन व कनिष्ठ लिपिक आशिष यशवंत पाटील ही लाचखोरांची नावे..

पोलीस वार्ता, भुसावळ : जळगाव जिल्ह्यातील खिरोदा येथे विद्यालयातील उपशिक्षिका असलेल्या महिलेची प्रसुती रजा मंजूर करून देण्यासाठी मुख्याध्यापिका आणि कनिष्ठ लिपिक यांनी 36 हजाराच्या लाचेची मागणी केली होती. आणि ती स्वीकारताना धुळे लाचलुचपत पथकाने (एसीबी) सोमवारी, सायंकाळी दि.7 जुलै 2025 रोजी त्यांना अटक केली आहे. या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या भ्रष्टाचाराला काय समजावे?
ही धक्कादायक घटना खिरोदा येथील जनता शिक्षण मंडळ संचलित, धनाजी नाना विद्यालयात घडली असून मुख्याध्यापिका मनीषा पितांबर महाजन, वय-57, रा. चिनावल रोड, खिरोदा तसेच कनिष्ठ लिपिक आशिष यशवंत पाटील, वय-27, रा. उदळी, ता.रावेर अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत.
याच संस्थेतून सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक या प्रकरणात तक्रारदार असून त्यांच्या सुनबाई ह्या देखील याच विद्यालयात उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या सूनबाईला प्रसुती रजा मिळण्यासाठी त्यांनी 2 जून 2025 रोजी संबंधित मुख्याध्यापिका यांच्याकडे रितसर अर्ज केला होता. त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांच्या सूनबाईच्या सांगण्यावरून मुख्याध्यापिका मनीषा महाजन यांची भेट घेतली. तेव्हा त्यांना सूनबाईच्या प्रसुती रजा मंजूर करून देण्यासाठी प्रती महिना 5 हजार प्रमाणे असे सहा महिन्यांचे एकूण 30 हजार रुपये लाच स्वरूपात मागण्यात आले.
त्यानंतर तक्रारदार यांनी दि.7 जुलै 2025 रोजी तक्रार दिल्याप्रमाणे लाचलुचपत पथकाने पडताळणी करून लाचेची 36 हजार रुपये रक्कम स्वीकारताना कनिष्ठ लिपिक आणि मुख्याध्यापिका यांना अटक केली आहे. दोघा आरोपींविरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई धुळे एसीबी पथकाचे पोउपअधी. सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोनि. रुपाली खांडवी, पोह. राजन कदम, मुकेश अहिरे, पावरा, पोकॉ. रामदास बारेला, पोचा. मोरे, बडगुजर यांच्या पथकाने मिळून केली.

✍️पोलीस वार्ता संपादक: निलेश फिरके, भुसावळ, संपर्क: 09960333469
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!