Homeउद्योगउपनगर आणि गंगापूर हद्दीत घरफोड्या करून चोरलेल्या मुद्देमालासह दोन आरोपींना अटक!

उपनगर आणि गंगापूर हद्दीत घरफोड्या करून चोरलेल्या मुद्देमालासह दोन आरोपींना अटक!

आरोपींनी दोन गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून सोने व चांदीचे दागिने, एक मोटार सायकल असा एकूण 64,370/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत..

पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरातील चोरी, घरफोड्या तसेच गुन्ह्यातील फरार चोर आणि सराईत गुन्हेगारांचा तपास करून कारवाई करण्याचे आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री.संदिप कर्णिक साहेब यांनी शहर पोलीस गुन्हेशाखा व संबंधित पोलीस ठाण्याना दिले आहेत.

याच अनुषंगाने उपनगर पोलीस ठाण्यात एक घरफोडीच्या घटनेचा गुन्हा दाखल झाला होता. ज्यात चोरट्यांनी मे महिन्यात ‘हॉटेल मँगो-ट्री’च्या पाठीमागे, देवळाली गाव, नाशिक येथील एकाच रात्री 2 बंद बंगल्यांचे कुलूप तोडले व बंगल्यात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले होते. यावरून गुरनं- 259/2025 भा.न्या.सं. कलम 305(अ), 331(4) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
या चोरीचा तपास गुन्हेशाखा युनिट-2 कडून करत असताना पथकाने घटनास्थळाची भेट घेऊन पाहणी केली असता दोन इसम हे तोंड पूर्ण झाकून रेनकोट घालून बंगले फोडताना सीसीटीव्हीत दिसून आले. त्यानंतर जवळपास 90 सीसीटीव्हींची पाहणी केल्यानंतर चोरी करणारे आरोपी हे म्हाडा बिल्डिंग संकुल, चुंचाळे शिवार, अंबड, नाशिक येथे राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
तपासात गुन्हेगारांची माहिती काढत असताना सपोउनि शंकर काळे व पोह मनोहर शिंदे यांना गुप्त माहिती मिळाली की, दोन सराईत घरफोडी गुन्हेगारांनी नाशिकरोड येथील बंगल्यांमध्ये चोरी केली असून ते घरकुल वसाहत, अंबड एम.आय.डी.सी. येथे एका काळ्या रंगाच्या दुचाकी नंबर 8510 टीव्हीएस व्हीक्टर, मोटार सायकलवरून येणार आहेत सदर माहिती गुन्हेशाखा युनिट- 2 चे सपोनि हेमंत तोडकर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शन सपोनि समाधान हिरे, सपोउनि शंकर काळे, बाळु शेळके, पोह मनोहर शिंदे, पोअं. महेश खांडबहाले, तेजस मते यांचे पथक तयार करून माहितीच्या आधारे सापळा लावून चुंचाळेगाव म्हाडा वसाहत अंबड येथून दोन आरोपींना दुचाकीसह पकडून त्यांची नावे विचारले असता त्यांनी 1)अफजल हुसने सैय्यद, वय-29, रा. बलकवडे चाळ, बलकवडे व्यायाम शाळेजवळ, भगुर ता.जि. नाशिक 2)विकास उर्फ विक्की सुधाकर पटेकर, वय-32, रा. नवीन समाज मंदिराजवळ, संत कबीरनगर, भोसला मिलीटरी स्कुलच्या पाठीमागे, गंगापुररोड, नाशिक असे सांगितले त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याची विचारपूस केली असता त्यांनी दि.20 मे रोजी रात्रीच्या सुमारास नाशिकरोड येथील मँगो ट्री लॉन्स जवळील बंद बंगल्यांत चोरी केल्याची कबुली दिली.
तसेच दि.29 मे 2025 रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास नवशा गणपती जवळ, जॉगींग ट्रॅक, आनंदवल्ली, गंगापुरोड, नाशिक येथील एका बंगल्याचे लॉक तोडून घरातील लोखंडी कपाटातील रोख रक्कम चोरी केल्याची देखील कबुली दिली असून आरोपीकडून सोने व चांदीचे दागिने, एक मोटार सायकल असा एकूण 64,370/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. कारवाईत उपनगर पोलीस ठाण्यातील गुरनं-259/2025 आणि गंगापूर पोलीस ठाणे येथील गुरनं-169/2025 कलम 305(अ), 331(3) 331(4) भा.न्या.सं. असे दोन्ही गुन्हे उघडकीस आले आहे. तसेच आरोपी अफजल हुसेन सैय्यद हा उपनगर पोलीस ठाण्यातील गुरनं-327/2024 कलम 305(अ), 331(4), 3(5) भा.न्या.सं. या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे तपासात मिळून आले. दोन्ही आरोपींना पुढील कारवाई करता उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-2 कडून करण्यात आली. पथकात विलास गांगुर्डे, प्रेमचंद गांगुर्डे, प्रकाश महाजन, सुनिल आहेर, चंद्रकांत गवळी, प्रकाश बोडके, संजय सानप, नंदकुमार नांदुर्डीकर, नितीन फुलमाळी, वाल्मीक चव्हाण, संजय पोर्टींदे, प्रविण वानखेडे, सुनिल खैरनार, जितेंद्र वजीरे यांचा देखील समावेश होता.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!