Homeआरोग्यअहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमान अपघातात गुजरातच्या माजी मुख्यमंत्री विजय रूपाणींचे निधन

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमान अपघातात गुजरातच्या माजी मुख्यमंत्री विजय रूपाणींचे निधन

गुजरातचे 16 मुख्यमंत्री म्हणून विजय रूपाणी यांनी 2016 ते 2021 या दरम्यान कार्यभार पाहिला..

पोलीस वार्ता, मुंबई : भारतीय एअर इंडियाचे (Air India) AI-171 हे विमान अहमदाबादहून लंडनला जात असताना टेकऑफनंतर काही मिनिटांतच विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत विमानात असलेल्या 242 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर होते यातील 204 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे तर 41 जखमी जणांवर उपचार चालू आहे. अशी माहिती अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी.एस मलिक यांनी दिली आहे.
या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे देखील अपघाती निधन झाले आहे. ते या विमानाने लंडनला येथे जात होते. केंद्रीय मंत्री सी.आर पाटील यांनी विजय रूपाणी यांच्या मृत्यूची माहिती माध्यमांना दिली आहे. हे विमान डॉक्टरांच्या वसतिगृहाजवळ कोसळले टेकऑफनंतर काही मिनिटांतच हा अपघात झाला.
माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी लंडनला का जात होते? याबाबत समजलेल्या माहितीनुसार विजय रूपाणी यांच्या पत्नी अंजली रूपाणी ह्या लंडनमध्ये आहेत आणि त्यांना परत भारतात आणण्यासाठी ते लंडनला चालले होते.
  • विजय रुपाणींचा राजकीय प्रवास..

गुजरातचे 16 मुख्यमंत्री म्हणून विजय रूपाणी यांनी 2016 ते 2021 या दरम्यान कार्यभार पाहिला ते भाजपकडून उमेदवारी करून राजकोट पश्चिममधून आमदार झाले होते. तसेच ते भाजपकडून 2006 ते 2012 दरम्यान राज्यसभेचे खासदारही राहून गेले आहेत. 2006 साली ते गुजरात पर्यटन मंडळ अध्यक्ष झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात ते गुजरात म्युनिसिपल फायनान्स बोर्डाचे अध्यक्ष होते. तसेच आनंदीबेन पटेल यांच्या सरकारमध्ये त्यांना परिवहन मंत्री पदी नियुक्ती केले होते. 2016 मध्ये ते गुजरात भाजपचे अध्यक्ष होते. तर 7 ऑगस्ट 2016 रोजी ते गुजरातचे मुख्यमंत्री बनले. 2017 मध्ये भाजपने गुजरात राज्यात निवडणूक जिंकली आणि पुन्हा विजय रूपाणी यांना संधी देऊन गुजरातचे मुख्यमंत्री केले गेले. आता त्यांच्या अपघाती निधनामुळे गुजरात भाजपला एक मोठा आघात बसला आहे. पक्षाचा एक बडा नेता घेल्याने भाजप नेनृत्व भविष्यात कुठे तरी गुजरातच्या राजकारणात कमी पडेल असे वाटते.

✍️पोलीस वार्ता प्रतिनिधी: दिनेश पाटील, ठाणे, संपर्क: 8097983334
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!