दोन्ही आरोपी विना परवाना विदेशी दारूची विक्री करत असताना आढळले त्यामुळे त्यांना घटनास्थळावरून ताब्यात घेत त्यांच्याकडून जप्त केलेला माल..
पोलीस वार्ता, यवतमाळ : तालुका व शहर वणी येथील गणेशपुर रोड भागात चालणाऱ्या अवैध दारू विक्री व्यवसायावर वणी पोलीसांकडून कारवाई करण्यात आली आहे. सुमारे 41,080/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोन जणांना यात अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोकॉ. गजानन शत्रुघ्न कुळ यांना या धंद्याविषयी माहिती मिळाली होती, त्यानुसार ठाणेदार गोपाल उंबरकर व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने पुढील कारवाई करण्यात आली. यात 1)आरोपी सदानंद अशोक पथाडे (वय 24) रा. केसुरली, 2)हर्षल राकेश खरे (वय 20) रा. रंगनाथ नगर, वणी अटकेतील दोन्ही आरोपी विना परवाना विदेशी दारूची विक्री करत असताना आढळले.
त्यामुळे त्यांना घटनास्थळावरून ताब्यात घेत त्यांच्याकडून जप्त केलेला माल सविस्तर, 1)रॉयल चॅलेंज कंपनीच्या 180 मिली 48 बॉटल किंमत 9120 रुपये, 2)ओल्डमन कंपनीच्या 180 मिली 48 बॉटल किंमत 6960 रुपये 3)गाडी नंबर एमएच 29 एस 846 क्रमांकाची जुनी हिरो होंडा अंदाजे किंमत 25000 रुपये असा एकूण 41 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65/अ/ई अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास महिला पोह. सिमा राठोड करत आहे.
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान
बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...