Homeआरोग्यअन्न व औषध प्रशासना मार्फत 1 ऑक्टोबर 2024 पासून नाशिक जिल्ह्यात विशेष...

अन्न व औषध प्रशासना मार्फत 1 ऑक्टोबर 2024 पासून नाशिक जिल्ह्यात विशेष मोहीम!

सणासुदीच्या काळात अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने अन्न पदार्थात भेसळ, अस्वच्छ व अनारोग्यकारक वातावरणात अन्न पदार्थांचे उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक व विक्री करण्याची दाट शक्यता असते.

नागरिकांना सुरक्षित व निर्भेळ अन्न पदार्थ उपलब्ध होण्यासाठी अन्न व औषध प्रशासना मार्फत 1 ऑक्टोबर 2024 पासून विशेष मोहीम..
पोलीस वार्ता, नाशिक | दिवाळी सणासुदीच्या काळात दूध व दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, नमकीन, फरसाण, खाद्यतेल, वनस्पती तूप, रवा, आटा, मैदा, बेसन, ड्राय फ्रूटस, चॉकलेटस् व तत्सम पदार्थ यांची जास्त मोठ्या प्रमाणात मागणी असते. अशावेळी काही असामाजिक तत्वे अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने अन्न पदार्थात भेसळ करून किंवा अस्वच्छ व अनारोग्यकारक वातावरणात अन्न पदार्थांचे उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक व विक्री करण्याची दाट शक्यता असते. या सर्व प्रकारांवर आळा घालणे व नागरिकांना सुरक्षित व निर्भेळ अन्न पदार्थ उपलब्ध होण्यासाठी अन्न व औषध प्रशासना मार्फत 1 ऑक्टोबर 2024 पासून विशेष मोहीम राबविण्यात येत असून ही मोहीम डिसेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे. अशी माहिती सहआयुक्त (अन्न), नाशिक विभाग म.ना.चौधरी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
विशेष मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालयाने केलेली कार्यवाही..
1) दुग्ध व दुग्धजन्य जसे पनीर, घी, इत्यादी अन्नपदार्थांचे 22 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेवून भेसळीच्या संशयावरून रुपये 99 हजार 570 किमतीचा 563 किलोग्रॅमचा साठा जप्त करण्यात आला आहे.
2) मिठाई व नमकीन या अन्न पदार्थाचे एकूण 32 नमुने विश्लेषणासाठी घेवून भेसळीच्या संशयावरून रुपये 31 हजार 350 किंमतीचा 219 किलोग्रॅमचा साठा जप्त केला आहे.
3) रवा, मैदा, बेसन, भगर इत्यादी अन्न पदार्थांचे एकूण 19 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेवून भेसळीच्या संशयावरून रूपये 86 हजार 600 किंमतीचा 866 किलोग्रॅमचा साठा जप्त केला आहे.
4) खाद्यतेल अन्न पदार्थाचे 16 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेवून भेसळीच्या संशयावरून रुपये 2 लाख 97 हजार 440 किंमतीचा 1 हजार 92 किलोग्रॅमचा साठा जप्त करण्यात आला आहे.
5) सणासुदीच्या काळात वापरण्यात येणारे इतर अन्न पदार्थ जसे चहा, शीतपेय, मसाले, इत्यादींचे 10 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेवून भेसळीच्या संशयावरून रुपये 8 लाख 71 हजार 730 किमतीचा 1 हजार 928 किलोग्रॅमचा साठा जप्त करण्यात आलेला आहे.
वरील जप्त केलेला अन्न पदार्थांचा साठा विश्लेषणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला असून अहवाल प्रापत होताच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी ग्राहकांनी टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क साधावा. तसे अन्न पदार्थांबाबत काही तक्रार असल्यास नागरिक प्रशासनाच्या Foscos प्रणालीवर ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतात, असे आवाहनही श्री.चौधरी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!