अकोट ( प्रियंका रमेश केदार ) जिल्हा अकोला येथे नुकत्याच लागलेल्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड च्या इयत्ता बारावीच्या निकालामध्ये श्री.भाऊसाहेब पोटे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेत निकालाची परंपरा कायम ठेवत महाविद्यालयाचा निकाल 98.87 एवढा लागला असुन, विज्ञान शाखेतून प्रथम येणारी कुमारी सार्थकी देवानंद बुधवंत 85.33% या विद्यार्थिनी नें पटकावला, द्वितीय येणारा विद्यार्थी दिप प्रवीण रहाटे 84.33% तर तृतीय कुमारी कोमल चंद्रकांत कोल्हे 80% व कला या शाखेचा निकाल 96.87% एवढा लागला असून यामध्ये प्रथम कु. हर्षा सुरेश व्यवहारे 87.83% द्वितीय कुमारी प्रतीक्षा सुनिल वानखडे 87.33% तर तृतीय कु. ऋतुजा गोपाल नहाटे 80 टक्के. तसेच एच एस सी व्ही सी विभागातून वर्ग बारावी मध्ये प्रथम कुमारी जामरा कस्तुरी मिठूसिंग, द्वितीय पवन भास्कर मेतकर, तृतीय आदित्य उत्तमराव आकोटकर, चतुर्थ विठ्ठल रामेश्वर शेंडे तर वर्ग अकरावी मध्ये प्रथम प्रथमेश पालेकर, द्वितीय अंकुश श्रीकृष्ण निमकर्डे,तृतीय कोमल बेलसरे, त्याचबरोबर राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये

राज्यातून प्रथम येणारा विद्यार्थी श्रेयस संगमेश्वर महल्ले वर्ग 7 वा (अ) 100 पैकी 100 गुण घेऊन प्रथम आला .द्वितीय येणारा विद्यार्थी सोहम गोपाल इंगळे तर कनिष्ठ महाविद्यालय विभागातून प्रथम येणारी विद्यार्थिनी कुमारी समीक्षा पांडुरंग कळसकार हिने हा सन्मान मिळविला.या सर्व विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा संस्थेच्या वतीने व शालेय प्रशासनाच्या वतीने स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन छत्रपती शाहू शिक्षण संस्थेच्या सचिव डॉक्टर मेघनाताई पोटे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थिनींना संस्थेचे कोषाध्यक्ष माननिय प्रवीण पोटे यांच्याकडुन रोख रक्कम देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.त्याचबरोबर शैक्षणिक सत्र 2024 -25 चा इयत्ता पाचवी ते अकरावी चा निकाल घोषित करण्यात आला वर्ग पाच ते सात चा निकाल शिक्षिका किरण इंगळे यांनी जाहीर केला वर्ग 8 वी. व नववीचा निकाल शिक्षिका क सुनीता गावंडे यांनी जाहीर केला तर इयत्ता अकरावी व एसएससीव्ही विभागाचा निकाल प्राध्यापक विवेक पोटे व प्राध्यापक प्रशांत सावळे यांनी जाहीर केला. प्रस्तुत कार्यक्रमाला प्राचार्य पि. बी. रावणकर , प्राध्यापक एन .एम.भावे , प्राध्यापक संदीप बोबडे , पर्यवेक्षक पी.एम. गावंडे प्राध्यापक विवेक पोटे व कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर मेघनाताई पोटे मॅडम यांनी अध्यक्षीय भाषणामधून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून ही गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाची परंपरा अशीच कायम ठेवावी असे गौरोदगार काढले.सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली त्यानंतर संस्थेचं दैवत छत्रपती शाहू महाराज … यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता सर्व शिक्षक शिक्षिका प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी विभाग प्रमुख यांच्या प्रयत्नाने कार्यक्रम यशस्वी झाले , या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन डॉक्टर किर्ती काळबांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. प्रशांत सावळे यांनी केले. सदर कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते… असे प्रसिद्धी प्रमुख शिक्षक कन्हैया गौर यांनी कळविले.






























